Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

श्री भगवान जगन्नाथाचे आ.आशुतोष काळेंनी घेतले आशिर्वाद

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

संपूर्ण देशात धार्मिक सण-उत्सवाप्रमाणे काढण्यात येणारी श्री भगवान जगन्नाथ यात्रा मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी रविवार (दि.२९) रोजी कोपरगावमध्ये काढण्यात आली होती. या रथ यात्रेत आ. आशुतोष काळे यांनी सहभागी होवून सेवा करून श्री भगवान जगन्नाथाचे मनोभावे पूजन करून आशिर्वाद घेतले.मागील कित्येक शतकापासून ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे भगवान श्री जगन्नाथाची भव्य दिव्य रथयात्रा काढण्यात येते. हा सोहळा साजरा करण्यासाठी देश विदेशातून जगन्नाथ पुरी येथे दरवर्षी लाखो भाविक येत असतात आणि भगवान जगन्नाथाचे दर्शन घेवून आशीर्वाद घेत असतात. परंतु प्रत्येक भक्ताला जगन्नाथ पुरी येथे जाने शक्य नसल्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य एसी भक्तीवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा संपूर्ण विश्वावर व्हावी यासाठी रथयात्रा सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात याहीवर्षी आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत संघ इस्कॉन कोपरगाव यांच्यावतीने श्रीमान सुंदर चैतन्य प्रभुजी व श्री लक्ष्मीनारायण दास यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात येवून हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री. भगवान जगन्नाथाची भव्य रथ यात्रा काढण्यात आली होती.

जाहिरात

रविवार (दि.२९) रोजी भगवान श्री जगन्नाथाची महाआरती करून हरे-कृष्ण, हरे-कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे च्या गजरात हि रथ यात्रा तहसील कार्यालय, भाजी मार्केट मैदान, गुरुद्वारा रोड, विघ्नेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान, छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक या मार्गाने काढण्यात आली. भगवान जगन्नाथ, भगवान बलदेव आणि माता सुभद्रादेवी यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाला फुलांसह रंगीबेरंगी वस्त्रांनी केलेली सजावटीतून भाविकांना जगन्नाथ पुरीच्या मुख्य रथ यात्रेची प्रचीती येवून भाविक सुखावले होते. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी देखील या रथ यात्रेत सहभागी होवून भगवान जगन्नाथाचा रथ ओढला. श्री भगवान जगन्नाथाचे मनोभावे पूजन करून आशिर्वाद घेतले. आपली कृपा दृष्टी मतदार संघातील जनतेवर कायम रहावी. मतदार संघाच्या विकासाचा रथ समर्थपणे ओढत असतांना आपले आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहावे अशी भगवान श्री जगन्नाथाच्या चरणी प्रार्थना केली.यावेळी मोठ्या संख्येने कोपरगावकर या रथ यात्रेत सहभागी झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »