रामलल्ला मूर्ती लोकार्पण व अखंड भारत म्युरल प्लेट्स प्रतिकृती बेस कामाचा शुभारंभ

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
श्री क्षेत्र चासनळी येथे श्रीराम सृष्टी येथे प्रभू श्रीरामलल्ला मूर्तीचे लोकार्पण तसेच अखंड भारत म्युरल प्लेट्स प्रतिकृती बेस कामाचा शुभारंभ आणि गोदावरी मातेची महाआरती उत्साहात पार पडली.या कार्यक्रमाचे उद्घाटन सुदर्शन टीव्हीचे चेअरमन व संपादक धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते व मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी संपूर्ण धार्मिक वातावरणात प्रभू रामलल्लाचे दर्शन, पूजन व आरती विधी पार पडले. चासनळी व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.यावेळी उपस्थित मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रभू रामलल्लाचे दर्शन घेऊन ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. तसेच, रामभक्तांनी मिळून उभारलेला हा उपक्रम संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.ही श्रीराम सृष्टी अध्यात्मिक चेतनेचे केंद्र ठरणार आहे. प्रभू श्रीराम हे धर्म,कर्तव्य,त्याग, शौर्य आणि सत्याचे प्रतीक आहेत.रामराज्य ही केवळ संकल्पना नाही तर ती एक प्रेरणा आहे.अयोध्या येथे प्रभु रामचंद्रांच्या मंदीराचे स्वप्न साकार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न मोलाचे ठरले आहे. सचिन राऊत यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या सहकार्याने होणारी ही श्रीराम सृष्टी नवचेतनेचा स्त्रोत आहे.या श्रीरामसृष्टीसाठी विशेष निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापूर्वीच मागणी केलेली असून त्यासाठी पाठपुरावा देखील सुरू आहे.

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या पासून कोल्हे परिवार आणि चासनळी आणि पंचक्रोशीचे ऋणानुबंध घट्ट आहेत त्या भावनेतून या सोहळ्याची ऊर्जा अनुभवल्याचे देखील यावेळी कोल्हे म्हणाल्या.या प्रसंगी जिल्हा बँक माजी संचालिका चैतालीताई काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मनेश गाडे, काळे कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे, सरपंच सुनीताताई बनसोडे,
श्रीराम सृष्टीची संकल्पना मांडणारे उपसरपंच विनायक गाडे, सचिन राऊत,सोमनाथ चांदगुडे,पंडितराव चांदगुडे,राहुल चांदगुडे, चासनळी व पंचक्रोशीतील सर्व रामभक्त ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीरामाच्या भक्ति आणि राष्ट्रनिष्ठेची एकत्रित प्रेरणा देणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला, युवा कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत उल्लेखनीय ठरली.