एस.एस.जी.एम. महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय विकास’ या संकल्पनेवर रांगोळी व भित्तिपत्रकाचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सद्गुरू गंगागीर महाराज संस्थेच्या गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय विकास’ या संकल्पनेवर आधारित रांगोळी व भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये विविध विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.महाविद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर रयत बँकेच्या कोपरगाव शाखेचे शाखाप्रमुख सालमुठे साहेब यांच्या शुभहस्ते व प्राचार्यांच्या प्रमुख उपस्थितीत रांगोळी स्पर्धा व भित्तिपत्रक स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.भित्तिपत्रक स्पर्धेत ५८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला तर रांगोळी स्पर्धेत २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला याबद्दल धन्यवाद दिले.यावेळी महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घन:श्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत,

ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य संजय शिंदे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. नीलेश मालपुरे, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी, भित्तिपत्रक समितीचे चेअरमन प्रा. महेश दिघे यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत,पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस.आर. दाभाडे यांनी केले. रांगोळी स्पर्धेसाठी डॉ. योगेश दाणे व प्रा. अनिता गोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.भित्तिपत्रक स्पर्धेसाठी डॉ. रावसाहेब दहे व प्रा. प्रसाद हाडोळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.