स्वत:ला सिध्द करण्याची भावना प्रबळ असली की, यश हमखास मिळते-अक्षय चोळके

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पुस्तकांनी मस्तक सक्षम होते. बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध आहेत, एकूण नोकरीच्या जागा पन्नास हजारांपेक्षा जास्त आहेत. यासाठी बुद्धिमत्ता अंकगणित या विषयांची तयारी करावयास हवी त्यासोबतच इंग्रजी व चालू घडामोडी याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, स्वतःला सिद्ध करण्याची भावना प्रबळ असली की यश हमखास प्राप्त होते असे प्रतिपादन संभाजीनगरच्या सारथी शिक्षणचे संचालक अक्षय चोळके यांनी केले.रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील वाणिज्य व्यवस्थापन,अर्थशास्त्र विभाग ,आय.बी.पी.एस.परीक्षा मार्गदर्शन केंद्र, करिअर कौन्सलिंग व प्लेसमेंट सेल,आणि बी.बी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वाणिज्य मंडळ उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते. ते आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये उपलब्ध असलेल्या विविध नोकऱ्यांच्या संदर्भात सेवा व संधी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे. कॉमर्स फोरमच्या वतीने आयोजित केलेल्या केंद्रीय सेवा आयोगाच्या नोकऱ्या प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे स्पर्धा परीक्षेतून यश प्राप्त होते त्यासाठी केंद्रीय सेवा आयोगाने ठरविलेला अभ्यासक्रम पूर्ण करावा अशी इच्छा व्यक्त केली. प्रमुख अतिथी लाभलेल्या याप्रसंगी सारथीचे संचालक सिद्धेश्वर कोंघे यांनी,विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर रहावे, पुस्तकांचे मित्र व्हा. असा सूचक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच सारथीचे व्यवस्थापक संजित कदम यांनी, विद्यार्थ्यांनी मेंटली फिट राहण्यासाठी फिजिकल फिट राहणे गरजेचे आहे.

असे सांगितले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्यांनी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यश प्राप्त करण्याची समान संधी उपलब्ध आहे. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी आपली कौशल्य आत्मसात करून योग्य त्या कौशल्यांच्या आधारे स्पर्धा परीक्षेचे नियोजन करावे, महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राचा लाभ घ्यावा, स्वत:चे ध्येय नेहमी नजरेसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे, महाविद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमात सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.सदर कार्यक्रमासाठी अर्थशास्त्रविभाग प्रमुख डॉ.बंडेराव तऱ्हाळ, डॉ. योगेश दाणे,डॉ.बाळू वाघमोडे, डॉ.योगिता भिलोरे, प्रा. अश्विनी पाटोळे,प्रा. सुरज हुसळे, प्रा. एस. ए. महाले, प्रा. एस. आर. खैरनार, प्रा. एन. एस. दळवी, तसेच बी.बी.ए. विभागातील प्रा.एम.बी. गवारे, प्रा.सी.सी. वाघ, प्रा.एस. एम. भांगरे, प्रा.पी. बी. गव्हाळे, यांसह वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अर्जुन भागवत यांनी करून दिला , तर कार्यक्रमाचे आभार डॉ. सीमा दाभाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. प्रतीक्षा संवत्सरकर, प्रा. सुनील काकडे यांनी केले.