जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा – भोजडे येथे जातीचे दाखले वाटप व रक्षाबंधन साजरे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
भोजडे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. वीर बिरसा मुंडा यांचे पूजन करून मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या तसेच आदिवासी बंधूंना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आपण मोठ्या आनंदात साजरा करत आहोत, तसेच मला आपण निमंत्रित केले याबद्दल मी आदिवासी बंधू-भगिनी तसेच युवकांचे मनापासून आभार मानते, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले. तसेच वीर एकलव्य, वीर बिरसा मुंडा व तंट्या नाईक यांना नमन करून, वीरभद्र महाराजांच्या प्रांगणात होत असलेल्या या कार्यक्रमाला संबोधित केले.माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब व बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील आदिवासी बांधवांना जमिनी मिळवून देण्यात आल्या आहेत. हिंगणी, वेळापूर, कुंभारी, करंजी, रवंदे या गावांतील आदिवासी जमिनींची पत्रे देऊन आज सातबारा उतारे तयार आहेत. जमिनी मिळाल्यानंतर त्या तयार करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. आदिवासी बांधवांना गायगट, म्हैसगट, ट्रॅक्टर, मालवाहू रिक्षा, तसेच खावटी यामध्ये गहू, तेल, मीठ, मिरची, मसाले आणि बँकेचे धनादेश वाटप करण्यात आले.या कामात ऑफिसचे दोन कर्मचारी सतत कार्यरत होते.

कोल्हे परिवाराच्या सेवेच्या व्रताचे पालन करत, विवेकभैय्या कोल्हे आदिवासी बांधवांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. आमचा परिवार आपल्यासाठी नेहमी तत्पर राहील, अशी ग्वाही स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली.मतदारसंघातील आदिवासी बंधू-भगिनी शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले तयार करून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून, आजही येथे जातीचे दाखले वितरित करण्यात आले.या प्रसंगी प्रास्ताविक बाबासाहेब सोनवणे, भाषण चांगदेव ढेपले सर यांनी केले तर आभार प्रकाश गायकवाड यांनी मानले.कार्यक्रमाला त्र्यंबकभाऊ सरोदे, सुरेशभाऊ जाधव, ज्ञानेश्वर सिनगर, मुकुंद काळे, रंगनाथ सिनगर, साहेबराव सिनगर, प्रकाश गायकवाड, शामराव गिऱ्हे, देवराम मंचरे, संजय सिनगर, कैलास धट, संतोष चव्हाण, बाळासाहेब सिनगर, बाबासाहेब मंचरे, वाल्मीक बोर्डे, महेंद्र आहेर, शैलेश भाऊ सिनगर, भाऊसाहेब घनघाव, ढेपले सर, शहाराम सिनगर, भाऊसाहेब मोरे, अशोक मंचरे, पोलीस पाटील देवेश माळवदे, आदिवासींचे धडाडीचे कार्यकर्ते बाबासाहेब सोनवणे आदी मान्यवर तसेच आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.