एस.एस.जी.एम महाविद्यालयात नवरात्रोत्सव निमित्त नवदुर्गा हेल्मेट रॅलीचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे एस.एस.जी.एम.महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामपूर यांच्या संयुक्तविद्यमाने नवरात्र उत्सवा निमित्त नवदुर्गा हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी कोपरगाव पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. एन. बी. गलांडे, सहाय्यक परिवहन निरीक्षक श्रीम.निकिता पानसरे व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर अनंता जोशी हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात उद्बोधनपर व्याख्यानाने झाली.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या कोपरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक.एन बी.गलांडे यांनी“प्रवासाविषयी आणि अपघात टाळण्याविषयी मार्गदर्शन सूचना केल्या”. श्रीम. निकिता पानसरे यांनी, “निश्चित उद्दिष्टापर्यंत सुखरूप पोहोचणे म्हणजे सुरक्षित प्रवास आहे, असे सांगून आज भारतामध्ये दररोज हजार अपघात होतात. हे टाळायचे असेल तर हेल्मेट वापरणे आवश्यक आहे” असे सांगितले.सदर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती लाभलेल्या संदीप निमसे यांनी, “हिंदू धर्मानुसार पुरुष देवतांना दोन आणि चार हात आहेत, पण स्त्री देवतांना अधिक अनेक हात आहे,कारण स्त्री एकाच वेळेस अनेक कार्य करत असते व तिच्या भूमिका ही अनेक असतात, अनेक नात्यांना धरून ती वावरत असते, हे त्या मागचे गृहीतक आहे.”असे यावेळी स्पष्ट केले. यानंतर अनंता जोशी (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर) यांनी, “स्त्रीचे वर्तन व संस्कार हे इतरांना संस्कार देणारे असून समाजाची दिशा घडवण्याचे काम यातून घडत असते.” असे सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी“महिला शिकल्यातर सर्व समाज शिकतो त्यामुळे महिला साक्षर करणे अत्यावश्यक आहे, आज समाजातील सर्व वर्गांना दिशा देण्याचे,मार्गदर्शन करण्याचे काम महिला करत आहेत.असे ठामपणे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.बंडेराव तऱ्हाळ यांनी केले, सदर कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संयोजन प्रा.बाळू वाघमोडे यांनी केले.सदर सूत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा दाभाडे यांनी केले आणि आभार प्रा.महेश दिघे यांनी मानले.