राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोपरगाव तहसीलदारांना दिले निवेदन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यात परतीच्या अतिवृष्टीमुळे व ढगसदृश्य पावसामुळे झालेल्या पिकांचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड संदीप वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला त्यामुळे शेतकरी बळीराजाची संपूर्ण आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे

तसेच या पावसामुळे बाजरी मका कपाशी ऊस आदींसह शेतमाल व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढवणारे सावट एक प्रकारे निर्माण झाले आहे शेतकरी बळीराजा हा देशाचा कणा असून तोच समाजाचा पोशिंदा आहे अशा वेळी सरकार व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आधार देणे अत्यंत गरजेचे आहेत तेव्हा कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मंजूर करावी व दिवाळी पूर्वी ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी तसेच कोपरगाव तालुक्यातील सर्व बाधित गावांमधील पिकांचे व शेतमालाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच यांची पिके पूर्णपणे नष्ट झाले आहे

अशा शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्यात यावी व महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी संबंधित त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी या प्रमुख मागण्या पूर्ण व्हाव्यात अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल याची शासनाने नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आली या निवेदनावर ॲड.संदिप वर्पे बापू रांधवणे, तान्हाजी जाधव, ॲड दिलीप लासुरे, ॲड. रमेश गव्हाणे सुरेश आसणे, सुनील वर्पे निखिल थोरात यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.