Breaking
ॲड.संदीप वर्पे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोपरगाव तालुका कार्याध्यक्षपदी तानाजी जाधव यांची निवड

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या पक्षनिष्ठा आणि कार्यक्षमतेचा विचार लक्षात घेता सदरचा निर्णय घेण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की तानाजी जाधव हे अनेक वर्षांपासून पक्षाचे सक्रिय होऊन काम करत असून, त्यांनी स्थानिक पातळीवर तसेच ग्रामीण भागात पक्ष वाढीसाठी व पक्षाची विचारधारा ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे व माहिती देऊन पक्ष वाढीसाठी ते काम करत आहेत तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्यावरील या नव्या जबाबदारी मुळे तालुक्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत होईल,असा विश्वास नियुक्ती पत्र देतांना राज्याचे प्रवक्ते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ॲड.संदीप वर्पे यांनी व्यक्त केला आहे याप्रसंगी तानाजी सावंत उपस्थितांचे आभार व्यक्त करताना म्हणाले की आज झालेल्या कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष पदासाठी माझ्या कामाची दखल घेत पक्षाने माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडीन.तसेच कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांना गती देण्यासाठी मी कटिबद्ध आहे व यापुढे अधिक जोमाने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गाव तिथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व तेथील कार्यकर्ते जोडण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने पक्षाचे काम करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.याप्रसंगी जाधव यांच्या या नियुक्ती बद्दल अहिल्यानगर जिल्हा प्रभारी व माजी आमदार अशोक (बापू) पवार,खासदार निलेश लंके, आमदार रोहित(दादा) पवार,माजी मंत्री प्राजक्त(दादा) तनपुरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »