राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाच्या कोपरगाव शहर उपाध्यक्ष पदी शुभम शिंदे यांची नियुक्ती

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम साहेबराव शिंदे यांनी गौतम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असून त्यांची सामाजिक न्याय विभागाच्या कोपरगाव शहर उपाध्यक्ष पदी शुभम साहेबराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संदीपजी वर्पे व कोपरगाव सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र शुभम शिंदे यांना देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सलमान पठाण आसिफ शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या निवडीबद्दल कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये एकच आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे.