एस.एस.जी.एम. कॉलेजात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन झाले. याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयीन खेळाडू दिल्ली येथील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल कु. साक्षी कुहिरे व दिल्ली येथील अखिल भारतीय स्थल सेना शिबिरात सहभागी झालेले राष्ट्रीय छात्र सेना सैनिक व महाविद्यालयाचे विद्यार्थी चि. प्रतीक सानप त्यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतच उत्तम खेळ शिकून घेतला तर आयुष्यभर त्यांना त्याचा उपयोग होईल अशी मौलिक स्वरूपाची माहिती दिली.

तसेच महाविद्यालयात क्रीडा सप्ताहात होणाऱ्या विविध खेळात सहभागी होण्याचे आवाहन केले.सदर प्रसंगी मयूर साठे यांनी मेजर ध्यानचंद यांचा संक्षिप्त जीवनपरिचय करून दिला. कु.अंजली कोल्हे या खेळाडू विद्यार्थिनीने राष्ट्रीय क्रीडा दिनाची शपथ उपस्थितांना दिली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विशाल पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रा. सुनील कदम यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी खेळाडू तसेच विद्यार्थी वर्गाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.