एस.एस.जी.एम महाविद्यालयात रयत शिक्षण संस्था स्थापना समारंभ उत्साहात संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे रयत शिक्षण संस्थेचा १०६ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेमध्ये २२विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी शुभेच्छा पर अभिभाषणात,विजयादशमीच्या दिवशी रयत शिक्षण संस्थेची कर्मवीर अण्णांनी केली आज महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त रयत शिक्षण संस्था काल आज आणि उद्या या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर ते पुढे असे म्हणाले की,महाराष्ट्राच्या शिक्षण इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा असा हा क्षण आहे.समाजपरिवर्तनासाठी शिक्षण आवश्यक आहे ही समाजाची गरज ओळखून कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था उभी केली.

भूतकाळातील कमवा आणि शिका योजनेपासून, आज वर्तमान काळातील इंटरॅक्टिव्ह पॅनल पर्यंत व उद्याच्या युगात रयतेच्या विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षण मिळावे म्हणून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयाचे शिक्षण मोठ्या प्रमाणात रयतेमध्ये दिले जात आहे, त्यामुळे रयतेचा विद्यार्थी समाजात नव्याने आपली अस्तित्व तयार करतो आहे.” असे ठामपणे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.संतोष पवार यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत, प्रा.संजय शिंदे, डॉ. निलेश मालपुरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते यांनी केले आणि आभार डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी मानले.