गौतम पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहन संस्थेचे संचालक बाबासाहेब होते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे निरीक्षक नारायण बारे, गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, सौ सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट चे प्राचार्य सुभाष भारती तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या एनसीसी व स्काऊटने शिस्तबद्ध संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. शाळेच्या युरो किड्स च्या चिमुकल्यांनीही मागे न राहता उत्कृष्टपणे भाषणे सादर केली.

शाळेच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले व शाळेच्या मल्लपटूंनी मल्लखांबावर विविध अविष्कार सादर करून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सौ. विजया गुरसळ यांनी केले.सूत्रसंचालन कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी तर आभार क्रीडा संचालक सुधाकर निलक यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, संस्था विश्वस्त आ. आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, सर्व संस्था संचालक यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक व सर्वांना ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.