एमआयडीसी मध्ये जागा मिळावी यासाठी जास्तीत जास्त उद्योग-व्यवसायिकांनीअर्ज करावे-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व आपले नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या नव उद्योजकांना उद्योग व्यवसायाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे कोपरगाव शहरात एमआयडीसी उभारणार आहेत. भविष्यात कोपरगावमध्ये होणाऱ्या या एम.आय.डी.सी.मध्ये कोपरगाव मतदारसंघातील उद्योजकांचा मोठा सहभाग असावा यासाठी कोपरगाव मतदारसंघातील व्यापारी बांधवांनी व उद्योजकांनी आपले जागा मागणीचे जास्तीत जास्त अर्ज एमआयडीसीकडे दाखल.करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांनी व्यापारी बांधवांची बैठक घेतली या बैठकीत होणाऱ्या एमआयडीसी बाबत व्यापारी बांधवांशी चर्चा करतांना ते बोलत होते.ते म्हणाले की, मागील पाच वर्षात मतदार संघाच्या विकासाची मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शहराचा पाणी प्रश्न देखील सुटला असून भविष्यातील विकासाची भक्कम पायाभरणी करण्याच्या दृष्टीने कोपरगाव शहरात एमआयडीसी उभारण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार आहे.

त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पूर्तता सुरू असून या एमआयडीसीमुळे युवा उद्योजकांना उद्योजक होण्याचे स्वप्न व बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. या एमआयडीसीमध्ये जास्तीत जास्त उद्योजक हे कोपरगाव मतदार संघातील असावे यासाठी कोपरगाव मतदारसंघातील जास्तीत जास्त व्यापारी व उद्योजकांनी कोपरगावमध्ये भविष्यात होणाऱ्या एम.आय.डी.सी. मध्ये जागा मिळवण्यासाठी अर्ज करावे असे आवाहन यावेळी आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, व्यापारी महासंघाचे सदस्य व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.