Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

रानभाज्या महोत्सवाचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते उद्घाटन

रानभाज्या आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली अमूल्य देण – आ.आशुतोष काळे

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

तहसील कार्यालय कोपरगाव येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसीलदार महेश सावंत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, ग्रामीण भागातील पारंपरिक अन्न संस्कृती जपण्यासाठी तसेच आरोग्यदायी, पोषक आणि नैसर्गिक आहाराचा प्रसार करण्यासाठी रानभाज्या महत्त्वपूर्ण असून रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली अमूल्य देण असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आधुनिक जीवनशैलीत रानभाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आरोग्य, पोषण आणि परंपरा जपल्या जातात. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या वारशाची ओळख मिळते.आपल्या मातीत, जंगलात आणि शिवारात उगवणाऱ्या रान भाज्या व या भाज्यांची चव आणि औषधी गुणांची माहिती आजच्या पिढीला करून देणे गरजेचे आहे.

जाहिरात

अशा महोत्सवांमुळे आपली पारंपरिक अन्नसंस्कृती, आरोग्य आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांचा सुंदर संगम घडतो. या उपक्रमातून शेतकरी आणि महिला बचत गटांना आर्थिक आधार मिळतो, तसेच आपल्या वारशाचा गौरव वाढत असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी या महोत्सवात स्थानिक महिला बचतगट, शेतकरी व स्वयंसेवी संस्थांनी स्टॉल लावून विविध पारंपरिक रानभाज्या, त्यांचे पोषणमूल्य, उपयोग व स्वयंपाक पद्धतीचे सादरीकरण करत सहभाग घेतला.याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कृषी विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »