Breaking
आमदार आशुतोष काळे उद्योग समूह

कर्मवीर काळे कारखान्याचा ७१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न

सभासदांप्रमाणे कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देवून दिवाळी केली गोड

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत सरकारची काय धोरण आहेत व सरकार कशा पद्धतीने मदत करणार आहे याचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचे आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पासून चालत आली आहे. हि परंपरा मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही अविरतपणे सुरु ठेवणार आहे.ऊस दराच्या बाबतीत आमची कुणाशी स्पर्धा नाही आमची स्पर्धा आमच्याशीच आहे. आजवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी बांधील आहोत परंतु केवळ साखर उद्योगावरच जास्तीचा दर देणे शक्य नाही त्यासाठी उपपदार्थ निर्मिती करणे हि काळाची गरज असल्याचे सांगत भविष्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उपपदार्थ निर्मिती करणार असल्याचे सुतोवाच आ.आशुतोष काळे यांनी कारखान्याच्या २०२५/२६ च्या ७१ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी केले.

त्या विजयाची पुनरावृत्ती करायची आहे

नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व गट-गणाचे आरक्षण जाहीर झालेले आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापतीचे आरक्षण जाहीर झालेले असून लवकरच निवडणूकांच्या तारखा जाहीर होतील.आजवर सर्वांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नातून आपण विजयश्री प्राप्त केली आहे. यापुढेही त्याच विजयाची पुनरावृत्ती करायची आहे त्यासाठी तयारीला लागा. – आ.आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या वर्षाच्या ७१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.गौरीताई शिंदे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,अधिमंडळाच्या सभेमध्ये ऊस दराबाबत सांगितल्याप्रमाणे अंतिम हप्ता रु.१५०/-प्र.मे.टन दस-याच्या दुस-याच दिवशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला आहे. कारखान्याची सातत्याने योग्य ऊस दर देण्याची परंपरा असून आजपर्यंत कारखाना कार्यक्षेत्र व गेटकेन असा कोणताही भेदभाव न करता सरसकट रु.३,१००/-प्रमाणे ऊस दर दिला आहे. कांदा व इतर पिकातून मिळणाऱ्या उत्पनाचा विचार करता ऊस पिक परवडणारे आहे. चालू वर्षी समाधानकारक पाऊस झालेला असून भूजल पातळी टिकून आहे व सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे आवर्तन देखील समाधानकारक मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवडी कराव्यात असे आवाहन केले.

जाहिरात

ऊस उत्पादकांच्या ऑनलाईन नोंदी घेण्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. शेतक-यांची वैयक्तीक ऊस नोंद, उसाचे टनेज, ऊस बिलाची माहिती, उचल केलेल्या साखरेचा तपशिल इत्यादी माहिती अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार असून कारखान्याचा कारभार जास्तीत जास्त पेपरलेस कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे.ज्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली त्याप्रमाणेच कर्मचाऱ्यांची देखील दिवाळी गोड करण्यासाठी याहीवर्षी कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याचे जाहीर करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली. हे ए आय चे युग आहे.ए आय च्या माध्यमातून हवामान केद्र, सोलर, ड्रीप सिस्टीम, सेन्सर आदी गोष्टीचा उपयोग करून मातीत कोणत्या गोष्टीची कमतरता आहे याची अचूक माहिती मिळते. ड्रीपमधून योग्य खतमात्रा देवून व जीमिनीत कोणत्या भागात ओलावा कमी आहे त्या ठिकाणी ओल वाढविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी खर्चात, कमी क्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते पद्माकांत कुदळे, ज्ञानदेव मांजरे, एम.टी. रोहमारे, बाबासाहेब कोते, संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सचिन चांदगुडे, ॲड.राहुल रोहमारे, अनिल कदम, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, अशोकराव मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप,शंकरराव चव्हाण, सौ.इंदूबाई शिंदे, सौ.वत्सलाबाई जाधव, दिनार कुदळे, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने,

जाहिरात

मा.उपसभापती अर्जुनराव काळे, गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवण, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरेचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे,गौतम केनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष, गवळी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, तसेच सर्व सलग्न संस्थांचे आजी माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर संचालक सूर्यभान कोळपे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »