आ.आशुतोष काळे यांचा जनता दरबार सोमवारी पंचायत समिती कार्यालयात

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जनता दरबाराच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयात मतदार संघातील जनतेला येणाऱ्या समस्या आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्या आहेत. त्यासाठी विविध विभागांचे नियमितपणे जनता दरबार ते घेत आहेत. त्याप्रमाणे पंचायत समितीच्या सर्व विभागातील तसेच पशु संवर्धन व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) या विभागाच्या ज्या नागरीकांच्या समस्या अडचणी आहेत

त्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला असून सोमवार (दि.१३) रोजी दुपारी ०२:०० वा. कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात ते जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.मतदार संघातील बहुसंख्य नागरिकांचे अनेक शासकीय कार्यालयात विविध प्रकारची कामे असतात. त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्वच स्तरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने अनेकवेळा जावे लागते.शासकीय कार्यालयात येणाऱ्या मतदार संघातील नागरिकांची कामे विना अडथळा लवकरात लवकर व्हावीत.यासाठी येणाऱ्या अडी-अडचणी समजून घेवून या अडीअडचणी विविध शासकीय कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत एकाचवेळी चर्चा घडवून ते प्रश्न तातडीने सुटावे यासाठी आ.आशुतोष काळे नियमितपणे जनता दरबार घेत आहे.ज्या नागरीकांच्या पंचायत समिती तसेच पशु संवर्धन व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) या विभागाच्या अडचणी आहेत

अशा नागरिकांनी असून सोमवार (दि.१३) रोजी दुपारी ०२:०० वा. कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्या. जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त नागरिकांचे प्रश्न सुटावेत त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.