जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतमच्या मुलींचा विजय

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आयोजित जिल्हास्तरीय मुलींच्या शालेय हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १० ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथे पार पडली. गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या १४ वर्षाखालील संघाने संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखून हि स्पर्धा जिंकली.

स्पर्धेत खेळतांना गौतमच्या मुलींनी उपांत्यपूर्व सामन्यात कर्जत संघाचा सरळ सेटमध्ये २५-१३ असा पराभव केला तर उपांत्य सामन्यात नेवासा तालुका संघाचा सरळ सेटमध्ये २५-१२, २५-१६ असा पराभव करून फायनल मध्ये प्रवेश केला.स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राहाता संघाचा सरळ सेट मध्ये २५-१८, २५-११ सामना जिंकून स्पर्धा ही जिंकली. १५ ऑक्टोबर रोजी इंदापूर येथे होणाऱ्या शालेय विभागीय हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा विजेता संघ अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.गौतम पब्लिक स्कूल च्या मुलींच्या विजेत्या हॉलीबॉल संघाचे संस्थेचे अध्यक्ष मा. आ.अशोकराव काळे, संस्था विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ.चैतालीताई काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सर्व संस्था सदस्य, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे व शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गौतम पब्लिक स्कूलच्या विजेत्या हॉलीबॉल संघास प्राचार्य नूर शेख यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, पर्यवेक्षिका ज्योती शेलार, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे व क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.