वारीसह पंचक्रोशीच्या विकासाच्या सेतूचे भूमिपूजन व लोकार्पण माझ्याच हातून व्हावे हि जनतेची इच्छा होती-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
माजी.आ.अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील त्यांच्या कार्यकाळात ज्या प्रमाणे गोदावरी नदीवर अनेक ठिकाणी पूल बांधले त्याप्रमाणे वारीचा पूल देखील त्यांना बांधायचा होता ते त्यांचे स्वप्न होते. परंतु त्यावेळी निधी अभावी हा पूल पूर्ण होवू शकला नाही.मात्र वारी व पंचक्रोशीच्या विकासाच्या सेतूचे भूमिपूजन व लोकार्पण माझ्याच हातून व्हावे हि जनतेची इच्छा होती असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव तालुक्यातील वारी येथे ६४.५० लक्ष रुपये निधीतून श्री रामेश्वर महादेव मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच चोंढी नाल्यातील पाण्याचे जलपूजन व कान्हेगाव येथे ५० लक्ष रुपये निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या श्री नरहरी (नृसिंह) देवस्थान परिसराच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, वारीला गोदावरी नदीवर एकेरी वाहतुकीसाठी छोटा व अरुंद पूल असल्यामुळे छोटे-मोठे अपघात होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याठिकाणी मोठा पूल व्हावा अशी वारीसह पंचक्रोशीतील नागरिकांची मागील पाच दशकापासूनची मागणी होती. वारी पुलाचा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून वारी व पंचक्रोशीच्या विकासाच्या सेतू पूर्णत्वाकडे जात आहे. हा सेतू लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होवून नागरीकांच्या अडचणी कायमच्या दूर होणार आहे व मा.आ.अशोकराव काळे यांचे पुलाचे स्वप्न देखील पूर्ण होणार याचे समाधान वाटते.वारीच्या सेतूप्रमाणेच वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे, वारी सबस्टेशन क्षमता वाढ केली, महत्वांच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत व उर्वरित रस्त्यांना लवकरच निधी प्राप्त होईल. कान्हेगाव येथे ५० लक्ष रुपये निधीतून श्री नरहरी (नृसिंह) देवस्थान परिसराचे सुशोभीकरण काम पूर्ण झाले आहे. श्री रामेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिल्यामुळे या देवस्थानच्या विकासाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. श्री जगदंबा देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करा त्यासाठी पाठपुरावा करून तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करील.

परंतु आपल्याला एवढ्याच विकासावर थांबायचे नाही. पूर्व भागातील गावांना एकमेकांना जोडणारा महत्वाचा वारीचा सेतू हा सेतू फक्त वारीचा नाही तर पूर्व भागाच्या विकासाला चालना देणारा हा महत्वपूर्ण सेतू पूर्णत्वाकडे जात आहे. भविष्यात अनेक विकासकामे झाली पाहिजे या तुमच्या अपेक्षा आहेत व माझ्या पण विकासाच्या अनेक संकल्पना मला सत्यात उतरवायच्या आहेत. त्यासाठी आपली साथ व सहकार्य असेच ठेवा ती माझ्यासाठी प्रेरणा असून यापुढील काळात जास्तीत जास्त विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.