सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम -अजित पवार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांची एक वेगळी दूरदृष्टी होती. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली. तेच कार्य पुढे नेण्याचे काम बिपीन कोल्हे व विवेक कोल्हे करत आहेत. सहकारी तत्त्वावरील कारखान्यात सर्वाधिक उपउत्पाद निर्मिती करण्यात हा कारखाना आघाडीवर आहे.

पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान व शेतकरी कल्याण यामध्ये वेगळी ओळख या कारखान्याने निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत शासन नक्कीच संवेदनशील आहे.

बळीराजाला हे शासन वाऱ्यावर सोडणार नाही. खंबीरपणे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारनेही वेळीवेळी राज्य शासनाला नेहमी मदत केली आहे.

लवकरच याबाबत निर्णय होईल असे त्यांनी शेवटी नमूद केले. या कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक विवेक कोल्हे यांनी केले. यावेळी संजीवनी उद्योग समूहाची वाटचाल दर्शविणारी चित्रफीत याप्रसंगी दाखवण्यात आली.