राज्य शासनाला मदतीसाठी केंद्र शासनाचा कायम पाठिंबा – एकनाथ शिंदे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
साखर कारखान्याच्या या प्रकल्पामुळे हा कारखाना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती निर्माण होईल.शिक्षण,उद्योग, बँकिंग या क्षेत्रांत आपण पुढे जात आहोत.

२०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे होत आहे. अशा वेळी बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अशा प्रकल्पांचा नक्कीच फायदा होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सहकारी साखर कारखाने अडचणीत आले तेव्हा १० हजार कोटी रुपये कर माफ करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्रालयाने घेतला.

कायम सहकाराला बळकटी देण्याचे काम केंद्र सरकारने केले, असेही त्यांनी सांगितले. राज्यात पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांची शेती वाहून गेली. पिकांचे व घरांचे नुकसान झाले.

अशा वेळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. संकट मोठे आहे, मात्र निश्चितपणे केंद्र सरकार ताकदीने उभे राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.