Breaking
संजीवनी उद्योग समूह

बळीराजाला स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सहकारातील पहिला सीएनजी प्रकल्प या साखर कारखान्यात होत आहे. शेतकरी हा अन्नदाता सोबत ऊर्जादाता झाला पाहिजे, हा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडला. केंद्र सरकारने त्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या व निधी उपलब्ध करून दिला. साखर उद्योग जगला पाहिजे व रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, हा विचार केंद्र सरकारने केला.

जाहिरात

इथेनॉल प्रकल्पामुळे साखर उद्योगातील नुकसान भरून निघण्यास व शाश्वतता येण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले, जगासमोर आज वातावरण बदलाचा प्रश्न भेडसावतो आहे. आपल्या राज्यात मे महिन्यात पाऊस झाला व अजूनही कोसळतो आहे. शेतकऱ्यावर संकट आले आहे; ४० टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. अशावेळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

जाहिरात

केंद्र सरकारचा राज्य शासनाला कायम पाठिंबा मिळत आला आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे, मात्र त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न राज्य शासन करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सध्या वातावरण बदलाचे दुष्परिणाम दिसत आहेत. कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी करणे हा त्यावरील उपाय आहे. पेट्रोल, डिझेलच्या अधिक वापरामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून सोलर प्रकल्प राज्यात तयार केले. त्याशिवाय पेट्रोल,डिझेलमध्ये मिश्रणाचा प्रयोग आपण केला.

जाहिरात

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सुरू केलेला कॉम्प्रेस्ड बायो गॅस हा सर्क्युलर इकॉनॉमीचा प्रकल्प आहे. कचऱ्यातून गॅस निर्मिती होत आहे. गॅस तयार करताना निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून बायो फर्टिलायझर तयार केले. ही परिवर्तनीय ऊर्जा निर्मिती असून या प्रकल्पातून १ लाख १० हजार लिटर पेट्रोल-डिझेल वाचवणार आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. या प्रकल्पामुळे पोटॅश आयातीचा खर्च टळून परकीय चलन वाचेल. अशा प्रकारची अनेक युनिट उभारायची असल्याचे केंद्र शासनाने सांगितले असून राज्यातील इतर कारखान्यांनी यासाठी पुढे यावे. विवेक कोल्हे हे या प्रक्रियेचे प्रणेते असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी काढले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »