प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कोपरगावला रविवारी राष्ट्रवादीचा मेळावा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत तसेच माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.२८ जुलै २०२४ रोजी दुपारी ४.०० वा. कृष्णाई बॅक्वेट हॉल कोपरगाव येथे मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी दिली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अनमोल सहकार्यातून आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला आहे.मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कोपरगाव मतदार संघातील अनेक विकास कामे आ.आशुतोष काळे यांनी पूर्ण करून दाखवत कोपरगाव मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला केला आहे. मतदार संघातील तळागाळातील जनतेपर्यंत विकास पोहोचला असून आ.आशुतोष काळे यांच्या कामगिरीवर मतदार संघातील जनता समाधानी आहे.त्यामुळे मतदार संघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा यशाचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी या मेळाव्यात मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी केले आहे.