कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी २ पुरुषांसह १ महिलेचा मृत्यू तर १ जखमी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत रविवार दिनांक १६ जून २०२४ रोजी तालुक्यात विविध ठिकाणी २ पुरुषांसह १ महिलेचा मृत्यू झाला असून १ जण जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की रविवारी सकाळी ०७.४५ वाजेच्या सुमारास मढी बुद्रुक येथील राहुल बापूसाहेब खरणार (वय ४२) हे त्यांच्या राहत्या घरात इलेक्ट्रिक वायरचा शॉक बसल्याने ते बेशुद्ध झाले त्यांना तात्काळ औषध उपचारासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा हॉस्पिटल येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले त्यावरून सदर घटनेची माहिती अनिल यादव खरणार रा. मढी बु तालुका कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला ११ वाजून ३० मिनिटांनी दिली त्या माहितीच्या आधारे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर २९ /२०२२ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार जी.एस वांढेकर हे करीत आहे तर दुसरी घटना येवला तालुक्यातील अनकवाडे येथून तुळशीदास भीवराव जाधव हे त्यांची पत्नी नंदूबाई तुळशीदास जाधव हे दोघे पती-पत्नी कोपरगावच्या दिशेने येत असतांना येसगाव शिवारातील जिओ पेट्रोल पंपा समोर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने चोराची धडक दिल्याने त्यामध्ये नंदूबाई जाधव वय ४८ या गंभीर जखमी होऊन त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे तर दुचाकीस्वार तुळशीदास भीमराव जाधव हे गंभीर जखमी झाले आहे याप्रकरणी त्यांचे नातेवाईक राहुल साहेबराव जावळे राहणार अनकवाडे तालुका येवला यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये येऊन सदर अपघातातील ट्रक नंबर आर जे ०९ जी.डी ५५२५ हा राजस्थानचा ट्रकने धडक देऊन सदरचा ट्रक घटनास्थळावरून पसार झाला आहे त्या अज्ञात ड्रायव्हर विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर तिसरी घटना कोपरगाव तालुक्यातील धारंणगाव शिवारातील रणशूर स्मारका समोर कोळपेवाडी कडून समीर मोहंम्मद शेख राहणार कोळगाव थडी हा कोपरगाव कडे जात असताना एका अज्ञात वाहनाने होंडा ॲक्टिवा एम एस १७ सी डब्ल्यू ४७६० या दुचाकीस जोराची धडक दिल्याने त्या धडकेत वरील इसम मयत झाला आहे याप्रकरणी अमीर महंमद शेख राहणार कोळगाव थडी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३२/२०२४ भा.द.वी कलम ३०३ (अ) २७९,४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ (अ) (ब) १७७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे व सहाय्यक फौजदार जी.एस वांढेकर यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक फौजदार जी.एस वांढेकर हे पुढील तपास करत आहे.