पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फेरबदलाची शक्यता

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शासनाने नागरिकांसाठी केलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी शेवटच्या नागरिकांपर्यंत न पोहोचल्याचा फटका या निवडणुकीत बसल्याने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची ताट शक्यता असून या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे यामधील काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल देखील होऊ शकतो त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील विजयकुमार गावित यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यता असून त्यामध्ये रवींद्र चव्हाण गिरीश महाजन यांचे प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे तसेच शिवेंद्रराजे भोसले नितेश राणे गणेश नाईक व माधुरी मिसाळ यांना नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.