गुन्हेगारी

व्यापारी राजेशकुमार गुप्ता अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह एक आरोपी शिर्डीतुन अटक

0 5 3 4 1 8

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

व्यापारी राजेशकुमार गुप्ता अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह एक आरोपी शिर्डीतुन अटक केला जेरबंद या बाबत सविस्तर वृत्त असे की विशेष पथकांचे पो.उप. नि मुक्तेश्वर लाड व पो.अं भगवान जाधव, पो.ना भुषण सोनवणे, हे शहरात गस्त करत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की म्हसरूल पोलीस ठाणे अंतर्गत गु.र.नं 54/2024, कलम-363,364,386,387,395 भांदवि सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील 20 लाख रूपयेंच्या खंडणीसाठी शहरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यास मध्यप्रदेशात घेऊन जाऊन 10 लाख रूपये खंडणी घेणा-या टोळीतील फरार असलेला मुख्य सुत्रधार व त्यांचा साथीदार आरोपी शिर्डी येथे येणार असल्यांची माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती संदिप मिटके स.पो.आ गुन्हे शाखा यांना देण्यात आली त्वरित वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिडी येथे रवाना करून शिर्डी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुप्त बातमीतील आरोपींच्या शोध घेत असतांना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्यांची माहिती मिळतांच पथकाने शिर्डी पोलीसांच्या मदतीने वरील नमूद गुन्ह्यातील आरोपींना त्वरित छापा टाकून ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्यांना शिर्डी पोलीस स्टेशनला आणून त्यांचे नाव गाव विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नावे 1) शिवा रविंद्र नेहरकर वय 23 वर्ष, रा.महाजन यांच्या घरात भाड्याने नंदनवन चौक, श्रीस्वामी समर्थ केंद्रा जवल, उत्तम नगर सिडको नाशिक येथे राहतो असे सांगितले तर दुसरा आरोपी शुभम नानासाहेब खरात वय 25 वर्ष रा.संतोषी माता नगर सयोग रबर कंपणीच्या पाठिमागे, सातपुर एम आय डी सी नाशिक असे सांगीतले त्यावरून त्यांच्याकडे सदर घटनेची विचारपूस केली असता सदरचा गुन्हा केल्यांचे त्यांनी कबुली केले असून सदरचा गुन्हा केल्यापासुन ते फरार झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यांचा पुढील तपासा कामी म्हसरूळ पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु हा असुन तो गुप्ता यांच्या दुकानात कामाला होता शिव यानेच त्यांच्या मित्रांच्या मदतीने अपहरनाचा कट रचला होता.याबाबत सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहाय्य पोलीस आयुक्त संदिप मिटके स.पो.नि ज्ञानेश्वर मोहिते, पो.उप.नि.मुक्तेश्वर लाड, श्रे.पो.उप.नि दिलीप भोई, पो.ह.किशोर रोकडे, पो.ना.दत्ता चकोर, पो.ना.रविंद्र दिघे, पो.ना.भुषण सोनवणे, पो.अं. भगवान जाधव, पो.अं.अनिरूद्ध येवले, या विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 1 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे