संजीवनी उद्योग समूह

शिर्डीच्या साई नगरीत टीडीएफच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विवेक कोल्हेंना दिला जाहीर पाठिंबा 

अभ्यासू आणि प्रभावी उमेदवार म्हणुन शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण 

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

नाशिक विभाग मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विवेक कोल्हे यांनी आघाडी घेतली असून अभ्यासू तसेच चारीत्र्यसंपन्न उमेदवार म्हणून अहमदनगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या(टीडीएफ) पदाधिकारी यांनी शिर्डीत बैठक घेऊन विवेक कोल्हे यांच्या मातोश्री कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला. याबाबत सविस्तर वृत्त असे की शिर्डीतील हॉटेल टॅनिया प्रेसिडेंट इन मध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक मताने निर्णय घेण्यात आला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता बिपीनदादा कोल्हे ह्या होत्या. या प्रसंगी संजीवनी विद्यापीठाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, एन.एन. लगड,टीडीएफचे जिल्हाउपाध्यक्ष साहेबराव रक्टे, क्रीडा महासंघाचे उपाध्यक्ष संजय कंगले, प्राचार्य प्रमोद तोरणे, माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र नलगे, श्रीगोंद्याचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भारे, श्रीरामपूरचे तालुकध्यक्ष प्रशांत होन,आदींसह मान्यवर मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी शंकरराव जोर्वेकर,बाबासाहेब गांगुर्डे, एल.एम.डांगे, गजानन शेटे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक चांगदेव कडू यांनी केले तर सूत्र संचालन राजेंद्र कोहकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार सौ.कोल्हे म्हणाल्या की, विवेक कोल्हे यांनी तरुण वयातच सामाजिक, राजकीय, धार्मिक, सहकार क्षेत्रात उत्तम असे कार्य केले. तरुण वयातच ते ईफको सारख्या संस्थेत संचालक झाले. स्व.शंकरराव कोल्हे साहेबांच्या स्वभावासारखा विवेक कोल्हे यांचा स्वभाव आहे.स्व.कोल्हे साहेबांचा रयत शिक्षण संस्थेत महत्वपूर्ण योगदान देत रयत शिक्षण संस्थेत वाढविण्यासाठी योगदान दिले आहे. आमच्या संजीवनी शैक्षणिक संस्थेच्या प्रगतीत अमितदादा कोल्हे यांचे योगदान आहे. विवेक कोल्हे यांच्या माध्यमातून प्रथमच ही संधी जिल्ह्याला मिळत आहे.

ते शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आहेत.असा उमेदवार पारखून घेत पाठिंबा जाहीर केला. हा निर्णय साईबाबांच्या पावन भूमीत जाहीर केला. संकटे अनेक आली पण विवेक कोल्हे डगमगले नाहीत. त्यांना निवडून आणण्यासाठी आपण आशीर्वाद द्यावा. अशी विनंती त्यांनी केली. नगर जिल्ह्यातून मताधिक्य मिळाल्यास विजय निश्चीत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी एन. एस.लगड आपल्या भाषणात म्हणाले की,राज्य संघटनेने जो उमेदवार दिला. तो आमच्या पसंतीचा नाही. त्यामुळे नाशिक विभागातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी होती. मात्र विवेक कोल्हे हे सुशिक्षित आणि संस्कारी असल्याने आमच्या त्यांना जाहीर पाठिंबा आहे. त्यामुळे कोल्हे परिवाराने अ. नगर मध्ये प्रचारावर वेळ वाया न घालवता इतर जिल्ह्यात प्रचार करावा आम्हीही जोमाने प्रचार करणार आहोत असे सर्वांनी सांगितले. विवेक कोल्हे यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे असे लगड शेवटी म्हणाले.तसेच यावेळी बाळासाहेब गांगुर्डे म्हणाले की, सुशिक्षित उमेदवार विवेक कोल्हेच्या माध्यमातून मिळाला. म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेतली. हे सुसंस्कृत,अभ्यासू, शिक्षणकांची शोभा वाढवणारे नेर्तुत्व आहे, म्हणून त्यांनी रयत सेवक विकास आघाडीचा पाठिंबा जाहीर केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे