अजित पवारांनी आपल्या खासदार व आमदारांसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन आणि फोडले विधानसभा प्रचाराचे नारळ

मुंबई (दादर) प्रतिनिधी
आगामी विधानसभा आणि विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात जाऊन घेतले गणपती बाप्पाचे दर्शन व फोडला प्रचाराचा नारळ याप्रसंगी पक्षाचे सर्व खासदार व आमदार यावेळी उपस्थित होते याप्रसंगी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने बाप्पांची मूर्ती अजितदादानां भेट म्हणून देण्यात आली खऱ्या अर्थाने लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत होण्यासाठी येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरू करणार असल्यामुळे त्याची सुरुवात म्हणून अजितदादा पवारांनी आपल्या सर्व खासदार आमदारांना सोबत घेऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आम्ही यापुढील प्रवासात जनतेसमोर त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी जाणार आहोत त्यासाठी श्रीसिद्धीविनायकांने आम्हाला आशीर्वाद द्यावेत शेवटी जनता जनार्दन सर्व काही असते लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी जाणार आहोत त्या अगोदर नुकतीच राष्ट्रवादीची बैठक घेऊन या बैठकीत पक्षाची पुढची वाटचाल कशी असणार कशा पद्धतीने प्रचार करायचा याबद्दलची रणनीती ठरवण्यात आली येत्या विधान परिषदेसाठी अजितदादा पवार गटाकडून राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे हे दोन उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर केले आहे तसेच यावेळी सुनील तटकरे म्हणाले की आम्ही सर्वांनी मिळून प्रचाराचा श्री गणेशा केला आहे
आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विकासासाठी श्री सिद्धिविनायकाचे पूर्ण पाठबळ आम्हाला मिळेल हेच आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आज सर्व खासदार आमदार व आमचे सर्व पदाधिकारी सिद्धिविनायक चरणी लीन होण्यासाठी आलो आहोत त्यासाठी आम्ही आजच्या चांगल्या शुभ मुहूर्तावर प्रचाराचा श्री गणेशा करत आहोत तसेच अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय महत्त्वाच्या जबाबदारी देण्याबाबत ठरले आहे तर विधानसभेचा रोड मॅप यावेळी ठरवण्यात आला पुढच्या 90 दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्लॅन कसा राबवला जाणार आहे याबाबत अजित पवार यांचे ब्रँडिंग केले जाणार आहे शब्दाचा पक्का अजितदादा अशा आशयाचे कॅम्पेन राबवले जाणार आहे तसेच अर्थसंकल्पात अजित दादा पवारांनी केलेल्या घोषणा जनतेसाठी केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा व त्या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना करून द्या अशा काही महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे समजते.