कोपरगाव तालुक्यामध्ये आषाढ सरी बरसल्याने या हंगामाला तुर्तास जीवदान मिळाले

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा काल मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी आषाढ सरी बरसल्या त्यामुळे काही प्रमाणात का होईना बळीराजा सुखावला आहे रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या व सध्या उगवण झालेल्या पिकांना या पावसाने एक नव संजीवनी मिळाली आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी कमी पाऊस झाला तेव्हा पेरणी केली होती शेतकरी बळीराजाला वाटले सालाबाद प्रमाणे यंदा वरुनराजाचे आगमन वेळेवर झाल्यामुळे पाऊस हा येणारच या आशेने शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी केली मात्र मागील वीस-पंचवीस दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी बळीराजा चिंताग्रस्त झाला होता अखेर काल आषाढ सरीने त्या पिकांना जीवदान मिळेल अशी अपेक्षा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली जर या आठवड्यात पाऊस आला नसता तर हाता तोंडाशी आलेली खरिपाची पिके हातून जाण्याची भीती निर्माण झाली होती परंतु मंगळवारी कोपरगाव तालुक्यामध्ये संध्याकाळी कुठलाही आवाज न करता सोसाट्याचा वारा न वाहता अगदी हलक्या सरी ने आगमन केले व १०.२ मी.मी.इतका पाऊस झाल्याने या हंगामाला तुर्तास जीवदान मिळाले आहे तेव्हा बळीराजा पावसाच्या आगमनासाठी आभाळाकडे नजर लावून बसला आहे. आज बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे अजूनही शेतकरी बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.