जेऊर कुंभारी गावात चोरट्यांचा पाण्याच्या मोटारी केबल व स्टार्टर वर डल्ला

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील जेऊर कुंभारी गावातील शेतकऱ्यांच्या गोदावरी नदीकाठी असलेल्या विहिरी वरील इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटारी व केबल सह स्टार्टर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून याबाबत शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला जेऊर कुंभार येथील शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना भेटून निवेदन दिले यावेळी जेऊर कुंभारी येथील शेतकऱ्यांच्या आठवडा भरामध्ये अनेकांच्या इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी केबल सह स्टार्टर चोरीला गेले असून शेतकरी पुरता हतबल झाला आहे मागील आठवडा भरामध्ये महेंद्र रामदास वक्ते, सागर बाळासाहेब गुरसळ, यशवंत विठ्ठलराव आव्हाड, अमित गंगाधर भोंगळे, सुदाम तात्याबा वक्ते, माधवराव कचरू दौंड, किरण एकनाथ वक्ते, काशिनाथ पगारे यांच्या गोदावरी नदीकाठी असलेल्या इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी,केबल सह स्टार्टर चोरीला गेल्या आहेत याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी सदर चोरांचा शोध घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना उपस्थित जेऊर कुंभारी येथील शेतकऱ्यांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक देशमुख म्हणाले की आपण याबाबत लवकरच पोलीस पाटलांची बैठक घेऊन प्रत्येक गावामध्ये ग्रामसुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून रात्रीच्या वेळी पोलीस देखील पेट्रोलिंग साठी गावाला भेटी देण्याबाबत लवकरच नियोजन करू तसेच या भामट्यांचां लवकरच शोध घेऊ असे पो.नि.देशमुख यांनी महेंद्र पाटील वक्ते यांना आश्वासित केले आहे यावेळी जेऊर कुंभारी गावाचे पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.