आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये सर्व रोग निदान शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये सर्व रोग निदान व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर दिनांक १८ जुलै २०२४ ते २१ जुलै २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे गुरु पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर भव्य रक्तदान शिबिर व भव्य सर्व रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे हे सर्वरोग निदान शिबिर १८ जुलै ते २१ जुलै या कालावधीत तर रक्तदान शिबिर १९ जुलै ते २१ जुलै या दरम्यान घेण्यात येणार आहे सदर सर्वरोग निदान शिबिरा अंतर्गत आपण विविध प्रकारच्या आजारांची चाचणी करू शकतात या शिबिरा मध्ये विशेष तज्ञांच्या मदतीने आपल्या आरोग्याची चाचणी केली जाईल. या शिबिरात भाग घेण्यासाठी कृपया आपले वैद्यकीय रेकॉर्ड तपशील अशा माहितीची एक प्रत घेऊन येणे या शिबिरांतर्गत ओ.पी.डी तपासणी व बीपी – शुगर तपासणी मोफत करण्यात येणार असून उर्वरित सगळ्या वैद्यकीय तपासण्यांवर ५०% सवलत देण्यात येणार आहे.तरी गुरुपौर्णिमा निमित्त आलेल्या भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने तसेच कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आत्मा मालिक हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान म्हणून जास्तीत जास्त संख्येने परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिराची ठिकाण आत्मा मालिक हॉस्पिटल कोकण ठाण अधिक माहितीसाठी संपर्क-8956079398 अक्षय कंड्रे (जनसंपर्क अधिकारी) आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण ता.कोपरगाव जि.अहमदनगर.