कोपरगाव तालुक्यात विश्रांतीनंतर रिमझिम पाऊस

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यामध्ये मघा या नक्षत्राचे कोल्ह्यावरून आगमन झाले पडेलतर “मघा” अन्यथा आभाळाकडे “बघा” असे जुनी लोकं पूर्वी म्हणत असत अगदी त्याप्रमाणेच अनेक आठवड्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर सोमवारी दुपारून कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेच्या कडकडाटासह धुवाधार पावसाने झोडपून काढले त्यातच आज कोपरगाव शहराचा आठवडे बाजार असल्याने बाजार करण्यासाठी आलेल्या बाजार करूनची या पावसाने मोठी धांदल उडून दिली तसेच ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन आलेल्या विक्रेत्यांना अचानक आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले तसेच बाजार भरत असलेल्या ठिकाणी रिमझिम पाऊस पडल्यामुळे सर्वत्र चिखल होऊन घसरगुंडी सदृश्य परिस्थिती झाल्यामुळे अनेक जण बाजार घेऊन पडतांना दिसून आले मात्र आज सकाळपासून पावसाला पोषक हवामान तयार झाले होते शहर आणि तालुक्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली असतांनाच आज दुपारी मघा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला या पावसाची अत्यंत गरज होती पाण्यावर आलेल्या व कोमजत असलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे त्यातच आज रक्षाबंधन असल्यामुळे सुट्टीचा दिवस त्यामुळे राखी खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये महिलांची मुलींची एकच गर्दी दिसून येत होती मात्र अचानक दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांचीच एकच धावपळ उडाली त्यामध्ये लहान लहान मुलं कडेवर घेऊन काही महिला मिळेल तिथे आश्रयाला उभे होते सध्या कोपरगाव तालुक्यात खरिपाच्या सोयाबीन मका मुग व बाजरी या पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या होत्या सुरुवातीच्या काळात झालेल्या रिमझिम पावसाने ही पिके जोमात वाढली मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके पाण्यावर आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती त्यामुळे आज झालेल्या या पावसाने पिकांना काही प्रमाणात का होईना जीवदान मिळाले आहे त्यामुळे शेतकरी बळीराजा काही प्रमाणात का होईना सुखावला आहे.