कोपरगाव तालुक्यात १ वाजेपर्यंत झाले इतके टक्के मतदान

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी ०७.०० वाजेपासून मतदान होत आहे आहे महाराष्ट्राची सूत्रे पुढील पाच वर्षासाठी कोणत्या राजकीय आघाडीकडे सोपवायची याचा फैसला राज्यातील जवळपास साडेनऊ कोटीहून अधिक मतदार आज करत आहे महायुती व महाविकास आघाडी तसेच काही अपक्षांची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आज सकाळपासून कोपरगाव तालुक्यामध्ये ०७.०० वाजल्या पासून मतदानाला सुरुवात झाली कोपरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आशुतोष अशोकराव काळे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे तर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संदीप वर्पे निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यासोबतच इतर दहा अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब आजमावत आहे आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे ते १ वाजेपर्यंत अतिशय शांततेत मतदान पार पडतांना दिसून येत आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच मतदान केंद्रावर मोबाईलवर मनाई करण्यात आली असून मोबाईल आत नेण्यास परवानगी नसल्यामुळे अनेकांची ऐनवेळी पळधाव होत आहे तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २ लाख ८९ हजार ६५६ मतदार असून आज दुपारी १ वाजेपर्यंत ५८ हजार ३८० पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर ४८ हजार ६७० महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर १ तृतीयपंथीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे असे सर्व मिळून १ लाख ७ हजार ५१ मतदारांनी १ वाजेपर्यंत मतदान केले असून एकूण कोपरगाव विधानसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३६.९६ % मतदान झाले आहे.