कोपरगाव तालुक्यात मतदारांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद झाले ७१.४९ टक्के मतदान

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
काल बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ सकाळी ०७.०० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत अर्थात ०६.०० वाजेपर्यंत अतिशय शांततेत शहरात व तालुक्यात मतदान पार पडले कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर भारत तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) चे शस्त्रधारी जवान व पोलीस व होमगार्ड यांचा कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच मतदान केंद्रावर मोबाईल आत नेण्यास परवानगी नसल्यामुळे अनेकांची ऐनवेळी तारांबळ उडाली तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात २ लाख ८९ हजार ६५६ मतदार असून मतदान संपेपर्यंत १ लाख ७ हजार ३९४ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर ९९ हजार ६७९ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ४ तृतीयपंथीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे असे सर्व मिळून २ लाख ७ हजार ७७ मतदारांनी ६ वाजेपर्यंत मतदान केले असून एकूण कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ६ वाजे पर्यंत ७१.४९ % मतदान झाले आहे.
तसेच २१९ कोपरगांव विधानसभा मतदार संघातील २७२ मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रिया पुर्ण करुन परतणाऱ्या मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष,अधिकारी, कर्मचारी,पोलीस शिपाई यांचे गुलाब पुष्पगुच्छ देवून निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंकी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक सागर देशमुख,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,गटविकास अधिकारी संतोष राऊत,मुख्याधिकारी सुहास जगताप आदींनी त्यांचे स्वागत केले.