बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये येत्या सोमवार दिनांक १७ जून २०२४ रोजी बकरी ईद निमित्त कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व गाव स्तरीय शांतता समितीच्या बैठकीचे गुरुवार दिनांक १३ जून २०२४ रोजी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी पोलीस निरीक्षक देशमुख शांतता समितीच्या बैठकीस मार्गदर्शन करतांना म्हणाले की शहरासह परिसरात कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ईद नमाज पठणानंतर मुस्लिम रीती रिवाजानुसार होणारी कुर्बानी संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकात नमूद जनावरांच्या वाहतुकी व कत्तली संदर्भात काही मार्गदर्शक सूचना उपस्थितांना यावेळी देण्यात आल्या त्यानुसार १७ जून रोजी होत असलेल्या बकरी ईद निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
त्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पडली यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप महावितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पोलीस सब इन्स्पेक्टर रोहिदास ठोंबरे तसेच शहर हद्दीतील गावातील पोलीस पाटील व शांतता कमिटीतील नागरिक यावेळी उपस्थित होते.