संतोष साखर कारखान्याच्या नावाने दोन कोटीचे शेअर्स विकले मात्र अद्यापही तो कारखाना विद्यमान आमदारांने उभा केलेला नाही त्याची देखील तेवढ्याच तत्परतेने चौकशी व्हावी – विवेक कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संजीवनी उद्योग समूहावर आज पर्यंत एकही ठपका नसतांना मी केवळ नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला म्हणून काही लोकांनी मनामध्ये आकस ठेवून आमच्या संस्थांनवर धाडी टाकल्या हे नक्की आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे विशिष्ट खाती आहेत. त्या खात्यांमार्फत धाडी टाकण्यात आल्या. परंतू विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यावर देखील फसवणूक, पैशांचे गैरव्यवहार, जमीन बळकावणे व खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्या तत्परतेने आमच्या संस्थांवर शासनाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या त्याच तत्परतेने दराडे यांच्यावरील खटल्यांचा छडा तेवढ्याच तत्परतेने लावला पाहिजे, अशी मागणी नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केली.विवेक कोल्हे यांनी त्यांच्या संस्थांवर पडलेल्या धाडी संदर्भात गुरुवार दिनांक १३ जून २०२४ रोजी संजीवनी कार्यस्थळावर पत्रकार परीषद घेऊन विवेक कोल्हे यांनी आपले मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांचे बंधूही आमदार आहेत. त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा दिलेला होता. किशोर दराडे आता ते महायुतीत आले, मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली.
विखेंचे आभार,तांबेंकडे मदत मागणार शिक्षक मतदार संघातून राजेंद्र विखे यांनी आपला अर्ज मागे घेतल्या बद्दल त्यांचे आभार.राजकीय मतभेट असले तरी, ते पितृतुल्य आहेत तसेच ते माझे मार्गदर्शक आहेत. त्यांचे मला सहकार्य लाभेल. पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजीत तांबे यांच्याकडेही मदत मागणार असल्याचे विवेक कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
परंतू या निवडणूकीत आम्ही त्यांच्या समोर आव्हाण उभे केले त्यामुळेच आमच्या संस्थांवर धाडी पडल्या असाव्यात अशी शंका येण्यास वाव आहे. मी या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी माझ्यावर दबाव आणला होता मात्र मी आपली उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे २ जूनला माझ्या संस्थेवर पहिली धाड पडली, नंतर ७ तारखेला परत चौकशी केली. त्यानंतर. ११ जूनला दुपारी ०३.०० वाजता पुनश्च एकदा कागदपत्रांची तपासणी सुरू केली ती थेट १२ जूनच्या सकाळी ०७.०० वाजेपर्यंत चालली. पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि जालना या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचे पथक यावेळी उपस्थित होते. त्यांनी सखोल चौकशी केली पण अनियमिता किंवा त्रुटी त्यांना सापडल्या नाहीत अशा पद्धतीच्या धाडी पाडणे दुर्दैवी आहे. त्याचप्रमाणे किशोर दराडे यांच्यावर फसवणूक, खाेटे दस्ताऐवज बनविणे, फौजदारी कट रचणे, जमिन बळकावणे व खुना सारखे गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, २००१ मध्ये संतोष साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास दोन कोटीचे शेअर्स विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही. त्यांची देखील तितक्याच तत्परतेने चौकशी व्हावी व गोळा केलेली रक्कम व्याजासहित त्या नागरिकांना परत करावी अशी देखील मागणी विवेक कोल्हे यांनी याप्रसंगी केली आहे.