सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यक्षेत्रात तंत्रज्ञानाने उस उत्पादनांत सहज वाढ शक्य-डॉ.आर.एल.भिलारे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हेंची शिकवण आणि संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे मार्गदर्शन व कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या दुरदर्शीपणांमुळे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद शेतक-यांचे तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज एकरी १०० मे. टनाच्या पुढे उस उत्पादनांत वाढ शक्य असल्याचे प्रतिपादन पाडेगांव उस संशोधन केंद्राचे उस विशेषतज्ञ डॉ. आर. एल. भिलारे यांनी केले.तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गुरूवारी उस उत्पादक शेतकरी सभासदासाठी उस उत्पादन वाढीचे आंधुनिक तंत्रज्ञान याबाबत एकदिवसीय कार्यशाळा घेण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे होते. कारखान्याच्यावतीने यावेळी पाडेगांव उस संशोधन केंद्राचे डॉ. आर. एल. भिलारे, डॉ. सुरज नलावडे, डॉ. सुरेश उबाळे, डॉ. के. डी. भोईटे यांचा सत्कार करण्यांत आला. साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, ऊस विकास अधिकारी संदीप गवळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.डॉ. आर. एल. भिलारे पुढे म्हणाले की, शेतक-यांनी उस उत्पादन वाढीसाठी छोटया छोटया गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. आज तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. त्याचा वापर थेट शेतक-यांच्या बांधावर झाला पाहिजे. शेतक-यांनी टनेज मिळते म्हणुन सातत्यांने एकाच जातीच्या उसाचे बेणे वापरू नये. पाडेगांव उस संशोधन केंद्रावर अलीकडच्या काळात शेतक-यांना कमी खर्चात कमी पाण्यांत अधिक उत्पादन देणा-या सुधारित फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७, फुले ऊस १५००६ या उस जातींचे संशोधन केले असून त्याच ऊस जाती लावाव्यात. क्षारपड सह हलक्या, भारी विविध प्रकारच्या जमीनीत कुठल्या जातीच्या उसाच्या वाणांची लागवड करावी याची शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठांने केली असुन त्याचा आधार शेतक-यांनी घ्यावा तसेच कारखाना व्यवस्थापन, ऊस, शेतकी विभाग सातत्यांने याकडे लक्ष देते तेंव्हा त्यांच्यावरही लक्ष केंद्रीत करावे.

जमीनीत लोहाची मात्रा कमी पडली की, उस उत्पादनावर तपकिरी रंगाच्या ठिपक्यांचा रोग होतो त्यातुन शेतक-यांचे मोठे नुकसान होते. उस लागवडीत बेणे प्रकिया महत्वाची आहे. घटत चाललेल्या उस उत्पादनांत तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज वाढ शक्य आहे. डॉ. सुरज नलावडे यानी बदलत्या वातावरणांत उसाचे शाश्वत उत्पादनांसाठी किड व रोग नियंत्रणासाठी एकात्मीक रोग व्यवस्थापन कसे महत्वाचे आहे याबाबतचे मार्गदर्शन केले. उस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे यांनी ग्रामिण अर्थकारण उस शेतीवर मोठया प्रमाणांत अवलंबुन असुन त्यासाठी नेमकेपणाने काय केले पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन केले. शेतक-यांनी स्वतःच्या श्रीमंतीसाठी शेतातील मातीची श्रीमंती वाढविली पाहिजे म्हणजेच वेळच्या वेळी त्याकडे लक्ष द्यावे. उस समृध्दीसाठी शेतक-यांनी उसाचे खोडवे अधिक प्रमाणांत ठेवुन त्यातुन उत्पादन वाढवावे. डॉ. कैलास भोईटे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. पाडेगाव संशोधन केंद्राच्या सर्व अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील विविध सभासद शेतकऱ्यांच्या ऊस प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक तेथे उपाययोजना सुचवल्या.याप्रसंगी संचालक सर्व ज्ञानेश्वर होन, ज्ञानेश्वर परजणे, रमेश आभाळे, संजय औताडे, कैलासराव माळी, बापूसाहेब बारहाते, रमेश घोडेराव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी संचालक, उस उत्पादक सभासद शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक रमेश घोडेराव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ऊस विकास अधिकारी संदीप गवळी यांनी केले.