तांत्रिक कामगार महावितरण व वीज ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा दुवा -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
पावसाळ्यात तांत्रिक बिघाड होतात, त्यामुळे अनेक वेळा वीज पुरवठा खंडीत होतो. जर कधी रात्रीची वेळ असेल तर अशा परिस्थितीत शहरी भाग असो वा ग्रामीण भाग त्या भागातील नागरीकांना खंडीत वीजपुरवठा कधी सुरु होईल याची नागरीक आतुरतेने वात पाहत असतात. अशा वेळी विद्युत विभागाचे तांत्रिक कामगार वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून वीज सेवा पूर्ववत करतात. त्यामुळे तांत्रिक कामगार महावितरण आणि वीज ग्राहक यांच्यामधील अत्यंत महत्वाचा दुवा आहे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे केले आहे.कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे विद्युत क्षेत्र कामगार युनियनच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेच्या स्वमालकीच्या जागेवर ‘एकता प्रतिष्ठाण’ च्या कार्यालयाचे उदघाटन तसेच तांत्रिक भवन व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन आ.आशुतोष काळेंच्या हस्ते पार पडले.तसेच आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,तांत्रिक कामगारांचे वीज ग्राहकांशी दैनंदिन संबंध येत असतात.अडचणींच्या वेळी ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता विशेषतः पावसाळयात इमर्जन्सी मध्ये तांत्रिक कामगारांना चोवीस तास काम करावे लागते.महावितरणमध्ये मागील अकरा वर्षापासून तांत्रिक कामगारांची भरती करण्यात आलेली नसल्यामुळे कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करावे लागत असून कामगारांचा कामाचा लोड वाढलेला आहे.

याची जाणीव महायुती शासनाला असून महायुती शासन हे सर्वसामान्य घटकांचा विचार करणारे शासन आहे. त्याप्रमाणे तुमचे देखील प्रश्न महायुती शासन निश्चितपणे सोडविल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला. व सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिर व वृक्षारोपण आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल विद्युत क्षेत्र कामगार संघटनेचे कौतुक केले.यावेळी परमपूज्य माताजी शारदानंदगिरीजी महाराज, खा.भाऊसाहेब वाकचौरे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेशआबा परजणे,महावितरण संचालक राजेंद्र पवार, युनियनचे अध्यक्ष रवींद्र बाराई, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, गौतम बँकेचे संचालक शरद होन, चांदेकसारेचे सरपंच किरण होन,उपसरपंच वसीम शेख, भैरवनाथ-जोगेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलास चव्हाण, नारायण होन, रावसाहेब होन,डॉ.मुळे आदी मान्यवरांसह विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.