संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड

0 5 4 0 4 7

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव

कोपरगांव येथील संजीवनी के.बी.पी. पॉलीटेकिनकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी&पी) विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या दोन पदविका अभियंता मुलींना श्नायडर इलेक्ट्रिकल्स या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातुन आकर्षक वार्षिक पॅकेजवर नोकऱ्या मिळाल्या. एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या अभियंत्याना नोकरीसाठी पसंती देत असुन टी अँड पी विभागाची धडाकेबाज कामगिरी सुरू असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरन आहे. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ हा पालकांच्या मनातील विचार संजीवनी सार्थ करीत असल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत, अषी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.श्नायडर इलेक्ट्रिकल्स या विद्युत अभियांत्रिकीच्या अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आधाडीच्या कंपनीने ऐशालेय ऐश्वर्या भरत सिनारे व श्रध्दा बाळासाहेब शिरसाठ या दोन अभियंता मुलींची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड केली आहे.संजीवनी पॉलीटेकिनकने हमखास नोकरीबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी विश्वासाहर्ता निर्माण केली आहे.

संजीवनी पॉलीटेक्निकमधुन डीप्लोमा बेसवर चांगल्या पॅकेजची नोकरी मिळते हे मला व माझ्या वडीलांना माहित होते, म्हणुन मी येथेच प्रवेश घेतला. अनुभवी प्राद्यापकांनी तीन वर्षे जे शिकविले, ते चांगलेच ध्यानात राहीले. शेवटच्या वर्षात कंपनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला येण्याच्या अगोदर संबंधित कंपनीमधिल तंत्रज्ञान, त्या कंपनीचे उत्पादन, इत्यादी बाबीं विषयी आमचा टी अँड पी विभाग भरपुर तयारी करून घेतो. तशीच तयारी श्नायडर कंपनीच्या वेळी देखिल आमच्याकडून करून घेण्यात आली व आम्हा दोन मुलींची चांगल्या पॅकेजवर नोकरीसाठी निवड झाली. आमच्या आत्ता पर्यंच्या पिढ्यां मधून मुलगी म्हणुन मी पहिली नोकरदार मुलगी ठरणार आहे, याचा माझ्या कुटुंबाला अभिमान आहे. संजीवनीमळे माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले -नवोदित अभियंता श्रध्दा शिरसाठ.

त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची संजीवनीमध्येच प्रवेश मिळावा ही प्रबळ इच्दा असते. सध्या इ. १० वी व १२ वीचे निकाल जाहिर झाले असुन प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे. पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जाती संवर्गानुसार आवश्यक असणारे कागदपत्र, सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्या भविष्यात मिळणाऱ्या नोकरीच्या संधी, शैक्षणिक कर्ज, इत्यादी बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी व ऑनलाईन प्रवेश फॉर्म नोंदण्यासाठी संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये शासनाच्या वतीने स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मार्गदर्शन करण्या साठी तज्ञ प्राद्यापकांची नेमणुक करण्यात आली आहे.मागील बॅचेसच्या अभियंत्यांनी वेगवेगळ्याा कंपन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्याने एका पाठोपाठ एक कंपनी संजीवचनीच्या अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करीत आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले असुन ऐश्वर्या व श्रध्दा या दोन निवड झालेल्या अभियंता मुलींचे व त्यांच्या पालकांचे व पाचार्य ए.आर. मिरीकर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी ऐश्वर्या व श्रध्दाचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डीन अकॅडमिक डॉ. के.पी.जाधव, टी अँड पी विभाग प्रमुख प्रा.आय.के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. जी.एन.वट्टमवार, आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे