संजीवनी उद्योग समूह

सदगुरू शुक्राचार्य महाराज मंदिरामुळे कोपरगावची जागतिक स्तरावर ओळख – विवेकभैय्या कोल्हे

सदगुरू शुक्राचार्य महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पूजेचे यजमानपद उर्जादायी क्षण

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

जगातील एकमेव परम सदगुरू शुक्राचार्य महाराज मंदिर कोपरगाव बेट येथे आहे.गत पाच दिवसांपासून भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पूजेचे यजमान म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे होते.प्रधान हवन,उत्तरांग हवन,बलिदान पूर्णाहुती,
श्री.मूर्तीची स्थापना,प्राणप्रतिष्ठा व अनावरण महानैवेद्य,महाआरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना विवेकभैय्या कोल्हे यांनी शुक्राचार्य महाराज मंदिराची महती जगभरआहे.जगातील एकमेव मंदिर हे कोपरगाव येथे आहे.अध्यात्मिक ठेवा लाभेलेला हा परिसर आहे.संजीवनी मंत्र आणि शुक्राचार्य महाराज यांची महती अगाध आहे.विवाह सोहळ्याचे मुहूर्त न पाहता शुभ कार्य होणारे प्रभावी स्थान म्हणून मंदिराची प्रचिती सर्वत्र आहे.तेजस्वी मूर्तीची स्थापना होत असून भाविकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक स्थळावर आशीर्वाद घेण्यासाठी येऊन मंदिरासह परिसराचा अमूल्य ठेवा जतन करावा.कोपरगाव आणि परिसराचे हे भाग्य आहे की एकमेव मंदिर आपल्या परिसरात आहे.मंदिर समितीने अतिशय उत्तम आयोजन केले असून हा सोहळा कायमस्वरूपी स्मरणीय ठरणार आहे.पौराणिक आणि अध्यात्मिक समृद्धता येणाऱ्या पिढ्यांना आयुष्य जगण्यासाठी मोलाची ठरते.युवा शक्तीला अध्यात्मिक ऊर्जा मिळाली तर त्या पिढीची जडणघडण निश्चित आदर्श होते अशी भावना या सोहळ्याच्या प्रसंगी कोल्हे यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमास आखाडा परिषदेचे प्रवक्ते प.पू.महंत डॉ.भक्तीचरणदास महाराज,महंत राजाराम महाराज,महंत बालकदास महाराज,महंत चंदनदास महाराज,महंत पद्मचरणदास महाराज,महंत रमेशगिरी महाराज,महंत चंद्रहार महाराज,महंत परमानंद महाराज,महंत राघवेश्वरानंद गिरी महाराज (उंडे महाराज),साध्वी शारदा माताजी,जोशी गुरू,संजीवनी शिक्षण ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन नितीनदादा कोल्हे,अंबादास देवकर,पराग संधान,
संभाजी गावंड,राजेंद्र सांगळे, पोपट नरोडे,डॉ. क्षिरसागर,चंद्रशेखर भोंगळे,डॉ.भट्टड,विजय रोहम,दत्तात्रय सावंत,हेमंत वर्धन,

प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना धो धो पाऊस पडुन सर्वत्र पाणी वाहू लागल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला.यावेळी महाप्रसाद सुरू असतांना युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी स्वतः प्रसाद वाटपाची सेवा दिली.

दादाभाऊ नाईकवाडे,मंगेश पाटील,सचिन सावंत,जयप्रकाश आव्हाड,नरेंद्र आव्हाड,दिपक शिंदे,संदीप शिंदे,गोविंद शिंदे,अभिषेक आव्हाड,विशाल आव्हाड,कैलास लहिरे,सुनील नाईकवाडे, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी, खजिनदार गजानन को-हाळकर, सदस्य लक्ष्मीकांत कुलकर्णी,हेमंत पटवर्धन तसेच स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पऱ्हे, सदस्य संजय वडांगळे,रोहन दरपेल,शरद त्रिभुवन,चांगदेव आव्हाड,भागचंद रुईकर,बाळासाहेब लकारे,बाळासाहेब गाडे,मधुकर साखरे,सुजित वरखेडे,
विजय रोहम,आदिनाथ ढाकणे,विलास आव्हाड,
दिलीप सांगळे,दत्तात्रय सावंत,महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा,विशाल राऊत,व्यवस्थापक राजाराम पावरा,कैलास जाधव,अनिल आव्हाड, संतोष नेरे,प्रमोद नरोडे,विनोद नाईकवाडे,
सोमनाथ म्हस्के,सचिन सावंत,गोपी गायकवाड,
सिद्धार्थ साठे,सिद्धांत सोनवणे,रुपेश सिनगर,
रोहित कनगरे,जयप्रकाश आव्हाड,सुजल चंदनशिव यांच्या सह विश्वस्त मंडळ,सदस्य,पदाधिकारी, कर्मचारी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे