त्र्यंबकेश्वर मंदिरात बनावट ऑनलाईन दर्शन पास मिळवुन ते काळा बाजारात विकणारे ५ जणं पोलीसांनी केले जेरबंद

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
त्र्यंबकेश्वर जोर्तिलिंग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते. त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत. देणगी दर्शन रांगेसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परीसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परीसरात ऑनलाईन दर्शन पास मध्ये काळाबाजारा होत असल्या बाबत बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिध्द अध्यक्ष अतिरीक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेउन असे गैरप्रकार उघडकीस आणुन त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्र्यंबकेश्वर पोलीसांना तशा सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर घटनेची खातरजमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातुन एकुण ५ इसमांना ताब्यात घेवुन ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र कमांक वापरुन मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवुन ते गरजवंत भाविकांना प्रतिव्यक्ती २०० रुपये दराचा देणगी पास प्रतिव्यक्ती ७०० रुपये ते १,००० रुपये या दराने विकुन बनावट पासचा काळाबाजार करत असल्याचे त्यांच्या अंग झडतीतुन मिळालेल्या मोबाईल मधुन व मेल आयडीच्या हिस्ट्रीवरुन दिसुन आल्याने त्यांच्या विरुध्द पोलीस प्रशासनातर्फे तक्रार नोंदवण्यात आली त्यानुसार त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर कमांक १०२/२०२५ प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांनी अत्तापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकुण १६४८ बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये एकुण अंदाजे ५,००० भाविकांना बनावट पास चढयाभावाने विकल्याचे तपासा दिसुन आले आहे. या गुन्ह्यामध्ये दिलीप नाना झोले, रा. पेगलवाडी त्र्यंबक ता. त्र्यंबकेश्वर जि.नाशिक तसेच सुदाम राजु बदादे रा. पेगलवाडी नाशिक ता. त्र्यंबकेश्वर जि.नाशिक समाधान झुंबर चोथे रा. रोकडवाडी, ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक,शिवराज दिनकर आहेर रा.निरंजनी आखाड्या जवळ ता.त्र्यंबकेश्वर जि. नाशिक,व मनोहर मोहन शेवरे, रा.रोकडवाडी, ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक यांना अटक करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक, आदित्य मिरखेलकर, पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवी मगर, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गावित, यांच्या सह पो.हवालदार जाधव,पोहवा मुळाणे, पो.शि बोराडे,पो.शि राठोड,पो.शि ठाकरे हे पुढील तपास करीत आहेत.