एस एस जी एम च्या विद्यार्थ्यांना साऊथ कोरियात उच्च शिक्षणाची संधी – डॉ. रवींद्र बुलाखे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेचे एस एस जी एम महाविद्यालय SKKU युनिव्हर्सिटी, साउथ कोरिया यांच्याशी केलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी “संशोधनातील विविध संधी” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेकरिता डॉ. रवींद्र बुलाखे, SKKU युनिव्हर्सिटी,साऊथ कोरिया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की SKKU, युनिव्हर्सिटी ही एस एस जी एम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची द्वारे खुली करून देत आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. डॉ.रवींद्र बुलाखे यांनी त्यांच्या संशोधनाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून दिली तसेच संशोधनाच्या विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.टि सरोदे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सामंजस्य करारा अंतर्गत साऊथ कोरिया येथे उच्च शिक्षण घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ.विलास गाडे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास गाडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा दाभाडे आणि प्रा. प्रियंका पवार यांनी केले. डॉ. प्रतिभा रांधवणे यांनी आभार मानले तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत तसेच रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विभागातील सर्व प्राध्यापक या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्ती संख्येने उपस्थित होते.