कोपरगावात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा पुढे चालवितांना ब्राम्हण समाजाच्या अडी अडचणी सोडवून ब्राह्मण सभागृहासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. दिलेल्या निधीतून काही विकासकामे पूर्ण होत असून काही कामे भविष्यात होणार आहे. यापुढील काळातही निधीची आवश्यकता भासल्यास निधीची कमतरता पडू देणार नाही. कोणतीही गरज लागली तरी ब्राम्हण समाजासाठी माझे सदैव सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.कोपरगाव शहरात ब्राह्मण सभा कोपरगाव यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा शनिवार (दि.२६) रोजी मा. खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या शुभहस्ते व आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी कमी वयात गाजवीलेल्या शौर्याचा मराठा बांधवांना अभिमान असून त्यांचे कार्य कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी पुण्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला असून त्यानंतर आपल्या कोपरगाव शहरात देखील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा उभारण्यात आला याचा आनंद वाटतो. ब्राम्हण सभेच्या प्रत्येक कार्यात सहभागी होता येते हे माझे भाग्य आहे. आपल्यामुळे मला पुन्हा एकदा विधानसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

आपले आशीर्वाद असेच पाठीशी ठेवा आपल्याला माझी मदत लागल्यास मी सर्वतोपरी मदत करीन असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे, पुण्याच्या थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठाणचे सचिव कुंदनकुमार साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, पेशवे घराण्याचे वंशज चंद्रशेखर बर्वे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे कोषाध्यक्ष प्रविण कुलकर्णी, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, कोपरगाव ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, उपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, खजिनदार जयेश बडवे, संघटक महेंद्र कुलकर्णी, गौरीष लव्हुरीकर, संदीप देशपांडे, योगेश कुलकर्णी, अजिंक्य पदे, सदस्य सौ. ऐश्वर्याताई सातभाई, प्रसाद नाईक, वसंतराव ठोंबरे, संजीव देशपांडे, अनिल कुलकर्णी, डॉ. मिलिंद धारणगावकर, सदाशिव धारणगावकर, अॅड. श्रद्धा जवाद, सौ. वंदना चिकटे आदी मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व ब्राम्हण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.