आ.आशुतोष काळेंच्या सूचनेवरून पूर्व भागातील गाव तलाव, पाझर तलाव व कोळ नदीवरील बंधारे भरले

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
मे व जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले मात्र त्यानंतर पाऊस रुसून बसल्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरीकांच्या चिंता वाढल्या होत्या. या चिंता दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला नांदूर मध्यमेश्वरच्या नांदूर डाव्या कालव्यातून व पालखेड डाव्या कालव्यांतून गावतळे, बंधारे भरुन देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार पूर्व भागातील सावळगाव, शिरसगाव, उक्कडगाव, अंचलगाव, तीळवणी, गावातील काही गावतळे, बंधारे व कोळ नदीवरील बंधारे भरले असून काही बंधारे येत्या दोन ते तीन दिवसात भरले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंता दूर झाल्या असून नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.मागील एक महिन्यापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकड लागल्या होत्या परंतु कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण मात्र पाऊस पडण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील सावळगाव, शिरसगाव, उक्कडगाव, अंचलगाव, तीळवणी, गावातील शेतकऱ्यांच्या चिंता काहीशा वाढल्या होत्या. कोपरगाव तालुक्यात पाऊस नाही परंतु धरण क्षेत्रात अती प्रमाणात पाऊस होवून गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या पाण्यातून जायकवाडी धरण जुलै महिना संपण्यापुर्वीच जायकवाडी धरणाचा पाणी साठा ८० टक्याच्या वर जावून पोहोचला होता. तर कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावचे गावतळे, बंधारे कोरडेठाक पडण्यास सुरुवात झाली होती.

पावसाळा सुरु होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी अद्यापपर्यत कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे अजूनही भूजलपातळी वाढलेली नाही. पावसाने जर अजून काही काळ वाट पहायला लावली तर अजून चिंता वाढणार होत्या. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला तातडीने डाव्या-उजव्या व पालखेड कालव्याला ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेवरून पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे पूर्व भागातील गाव तलाव, पाझर तलाव व बंधारे भरले असून काही बंधारे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नागरिकांचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास निश्चितपणे मदत होणार आहे.तसेच गावा-गावातील गावतळे, बंधारे भरल्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होवून शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सावळगाव, शिरसगाव, उक्कडगाव, अंचलगाव, तीळवणी,कासली आदी गावातील नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.