शिर्डी कोपरगावातील चेन स्नॅचिंग करणारे ४ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
सध्या कोपरगाव राहता शिर्डी येथे सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याने या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका कडे दिला असता त्यांनी शिर्डी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून व तांत्रिक विश्लेषणात ही चोरी वडाळा महादेव येथील योगेश पटेकर यांने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे समोर आले त्यानुसार तपास केला असता सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले सदरचे सोने हे विक्रीसाठी सदर आरोपी हे अशोकनगर तालुका श्रीरामपूर येथे येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्या नुसार नेवासा श्रीरामपूर रोडवरील अशोक नगर फाटा येथे शुक्रवार दिनांक ५ जुलै २०२४ रोजी सापळा लावला असता सदर आरोपी हे अलगद जाळ्यामध्ये सापडले त्यांची अंग झडती घेतली असता सदर आरोपीकडे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले याबाबत सविस्तर वृत्त असे की नेवासा श्रीरामपूर रोडवरील अशोक नगर फाटा येथे सदर आरोपी हा एका विनाक्रमांकाच्या मोटार सायकल वरून अशोकनगर तालुका श्रीरामपूर येथे चोरी केलेले सोने विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्या वरुन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत थोरात दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाणे रवींद्र कर्डिले संदीप पवार मनोहर गोसावी देवेंद्र शेलार या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये योगेश सिताराम पटेकर वय २२ राहणार वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर तसेच राहुल माणिक अमराव वय २६ राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर योगेश बाबुराव नागरे वय २४ राहणार मनोली तालुका श्रीरामपूर पद्या अशोक पिंपळे वय ४० ही राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपींनी राहता शिर्डी कोपरगाव परिसरात चोरी केल्याची कबुली दिली असून त्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहे यामधील योगेश पटेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये १७ गुन्हे दाखल आहेत तर दुसरा आरोपी योगेश बाबुराव नागरे यांच्या विरोधात ३ गुन्हे दाखल आहेत तर पद्या अशोक पिंपळे हिच्यावर १ गुन्हा दाखल असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सदर आरोपींची कसून चौकशी करत असून अजून काही गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.