गावठी कट्टा बाळगणाऱ्या त्या दोघांना पोलीसांनी केली अटक

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव
कोपरगाव शहराजवळील नगर-मनमाड महामार्ग वर संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्टच्या मंगल कार्यालयाच्या कमानी जवळ रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चंद्रकांत जोर्वेकर यांच्या गाडीला काळ्या रंगाच्या स्प्लेंडर वर असलेल्या दोघांनी त्यांच्या दुचाकीचा कट मारून गावठी कट्ट्याने धमकाविणाऱ्यास कोपरगाव शहर पोलिसांनी रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास पकडले असून त्यातील एकाला अटक करण्यात यश आले मात्र मात्र त्याचा साथीदार हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला होता त्याला मंगळवार दिनांक १८ जून २०२४ रोजी त्याच्या राहत्या घरातून कैठे तालुका सिन्नर येथून गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला हजर करून अटक केली आहे सदर घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री नगर-मनमाड रस्त्यावरील संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्टच्या मंगल कार्यालयाच्या कमानीजवळ मयुर नवनाथ औताडे (वय २३) रा. पोहेगाव ता.कोपरगाव व त्याचा दुसरा साथीदार शुभम सोनवणे रा.कौठे ता. सिन्नर जि.नाशिक या दोघांनी त्यांच्या जवळील एम एच १७ डीबी ५९५० क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर गाडीने चंद्रकांत जोर्वेकर यांना कट मारला तसेच त्यांना थांबवून वाद घालीत गावठी कट्ट्याने चंद्रकांत जोर्वेकर यांना धमकावत असतांना वेळीच पोलिसांनी मयूर औताडे यास अटक केली. त्याच्या ताब्यातून दुचाकी व गावठी कट्टा असा एकूण ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई होत असताना घटनास्थळावरून शुभम सोनवणे हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला होता त्याला आज मंगळवार दिनांक १८ जून २०२४ रोजी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल महेश तावरे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांन विरूद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर /२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ भा.द.वि कलम ५०४ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भांमरे यांनी तपासाची चक्रे फिरवून सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे.