कोपरगाव शहरात उद्या संत भिमा भोई जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील गांधीनगर भागामध्ये मुंजोबा चौक येथे रविवार दिनांक २५ मे २०२५ रोजी संत भीमा भोई जन्मोत्सव सोहळ्या निमित्त एक गाव एक जयंती या उद्देशाने शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने गांधीनगर येथे मुंजोबा चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी संत महंतांचे पूजन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी होणार आहे तसेच प्रतिमा पूजन हे सुभाषनगर, दावल मलिक बाबा कमान तसेच शिवनेरी चौक व मुंजोबा चौक गांधीनगर या ठिकाणी प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे

तसेच सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी गांधीनगर येथे मुंजोबा चौकात समाज बांधवांच्या उपस्थितीत आरतीचा सामुदायिक कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर भव्य अशी आकर्षक मिरवणूक यामध्ये सटाणा येथून आलेले स्वर सम्राट बँड तसेच पेपर ब्लास्ट आणि एअर फायर, तसेच संत भीमा भोई यांची प्रतिमा ठेवलेला बग्गी रथ, भव्य अशी रंगीबेरंगी आतिश बाजी व व्हिडिओ शूटिंगचे आयोजन करण्यात आले आहेसदरची मिरवणुकी ही मुंजोबा चौक या ठिकाणाहून निघून धर्मयोध्दा शाम भाऊ चव्हाण चौक तहसील कचेरी मैदान, शिवनेरी चौक, सुभाषनगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व पुढे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी जाऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे
तेव्हा भोई समाज बांधवांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भोई समाज मिरवणूक कमिटीचे अध्यक्ष- आकाश रघुनाथ मोरे उपाध्यक्ष- विजय गोपीचंद मोरे निलेश सुधाकर शिवदे खजिनदार- रोहित अनिल लाडे, माऊली मंगल कार्यालय, ईश्वर साटोटे सचिव- गोरख परशराम वाडीले ,मयूर विनोद साटोटे, रविराज फकीरा साटोटे, विशाल भगवान जावरे, शुभम अरुण शिवदे, ओमकार रघुनाथ मोरे तसेच मिरवणुकीचे प्रमुख म्हणून रघुनाथभाऊ मोरे सोमनाथभाऊ लाडे सदाभाऊ साटोटे, राहुलभाऊ साठे दिपकभाऊ बरदे यांनी केले आहे.