कोपरगाव शहर पोलीस स्टेशन

कोपरगाव शहरात गुरुवारी पोलिसांसह बीएसएफ जवानांचे सशस्त्र संचलन

0 5 3 7 5 7

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्युज कोपरगाव 

कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुंबई येथून आलेले बीएसएफ जवानांचे सशस्त्र संचलन संपन्न
झाले याबाबत सविस्तर वृत्त असे की आज गुरुवार दिनांक २ मे २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता येणाऱ्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भाबंरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांच्यासह ०५ अंमलदार आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स चे कमांडर अखिलेश कुमार गुप्ता यांच्यासह ३७ जवानांनी

जाहिरात
जाहिरात

कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मधून निघून सुदेश टॉकीज समोरून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सरळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळून धांरणगाव रोड ने डॉ.ढिकले यांच्या हॉस्पिटल जवळून आयेशा कॉलनीतून खंदक नाला मार्गाने कोपरगाव बस स्थानक जवळ येऊन संचलनाची सांगता झाली तसेच वरिल संवेदनशील भागातून सशस्त्र संचलन केले. त्यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच बी.एस.एफ.चे अधिकारी व कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे