संत शिरोमणी नरहरी महाराजांचे वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षात मोलाचे योगदान – आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संत शिरोमणी नरहरीदास महाराज यांचे कार्य समस्त सुवर्णकार समाजासाठी उल्लेखनीय आहे.त्यांच्या जीवनकार्यात त्यांनी अनेक वर्षे विठ्ठलाची नितांत भक्ती करून विठ्ठल भक्तीचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रभर उमटविला.त्यांच्या अमुल्य योगदानाचे महत्त्व आणि प्रभाव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे. ते भक्ती व ज्ञानाचा अथांग सागर असून संत शिरोमणी नरहरी महाराजांचे वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षात मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव शहरात शनिवारी (दि.१५) रोजी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ.आशुतोष काळे यांनी संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी समस्त सुवर्णकार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आ.आशुतोष काळे पुढे बोलताना म्हणाले,की संत शिरोमणी नरहरी महाराज हे भक्तकवी महात्मा होते, त्यांनी भक्तिरसात चिंब भिजलेल्या अनेक काव्य रचनांची निर्मिती केली. राष्ट्र घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.संत नरहरी महाराज परम शिवभक्त होते.

त्यांच्या भक्तीचा वारसा समस्त सुवर्णकार समाजाने जपून ठेवला आहे.कोपरगाव मतदारसंघातील विविध समाजातील नागरिकांच्या मागणी नुसार विविध समाजाला समाज मंदिरे उभारण्यासाठी निधी दिला आहे.मागील पंचवार्षिक मध्ये सुवर्णकार समाजाच्या मागणीची दखल घेवून समाज मंदिराचे उभारणीसाठी २० लक्ष निधी दिला असून भविष्यात सुवर्णकार समाजाने अधिक निधीची मागणी केल्यास निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.यावेळी आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सुवर्णकार समाजाच्या सभागृहाचे त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी अहिर सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष पंडितराव यादव, सर्व विश्वस्त, लाड सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष संतोषजी देवळालीकर, सर्व विश्वस्त, समाज बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.