एस.एस.जी.एम.कॉलेज

यशस्वी होण्यासाठी युवकांनी स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे- एन .बी.धुमाळ

0 5 3 5 4 5

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

भाषेच्या माध्यमातून भावना समजून घेणे म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता होय,त्यासाठी आजच्या युगातील तरुणांनी स्वावलंबी, संस्कृत व काळानुसार बदलणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बदलती मानसिकता, ध्येय, संगत, दृष्टीकोन, तंत्रज्ञानात होणारे बदल स्वीकारणे गरजेचे आहे. यश प्राप्तीसाठी शिक्षण, आरोग्य, ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन या गोष्टी महत्त्वाच्या असता असे प्रतिपादन अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक, वक्ते व लेखक एन. बी. धुमाळ हे प्रमुख पाहुणे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. कॉलेजचा वार्षिक पारितोषिक व कै. सौ. सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांनी भूषविले.
ॲड. भगीरथ शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात, महाविद्यालयाला नॅक मूल्यांकनात A++ ग्रेड मिळून जे अत्युच्च यश मिळाले. महाविद्यालयाने मिळविलेले हे यश व विश्वास यामुळे शेतकरी व विविध घटकांना उपयुक्त होईल असा एक आगळावेगळा प्रकल्प महाविद्यालयात राबविण्याचे रयतच्या उच्चस्तरावर ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाहिरात
जाहिरात

याबरोबरच महाविद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम दरवर्षीच होत असला तरी, प्रत्येक वर्षीचे पारितोषिक विजेते वेगळे असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी याला विशेष महत्त्व असल्याचा उल्लेख करून, त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी केले. प्राचार्यांनी आपल्या प्रस्ताविकांमध्ये पाहुण्यांचा शब्दसुमनांनी स्वागत करून, कर्मवीरांची स्वप्नातील रयत प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न एस.एस. जी.एम.महाविद्यालय करत आहे. असे आवर्जून सांगितले.महाविद्यालयाचे अहवाल वाचन प्रा.अरुण देशमुख यांनी केले.गुणवंत प्राध्यापकांमध्ये प्रा. डॉ. देविदास रणधीर (रिसर्च प्रोजेक्ट) प्रा. डॉ. संगीता दवंगे, प्रा. काजल साळुंके, प्रा. गणेश सोनवणे,प्रा.अश्विनी पाटोळे,मोरेश बांगर(नेट,सेट परीक्षा उत्तीर्ण), प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे( प्रा. डॉ. र. बा. मंचरकर स्मृती पुरस्कार २०२४), डॉ. वंदना घोडके (पीएच.डी पदवी प्राप्त), प्रा. डॉ. रावसाहेब दहे (पीएच.डी पदवी व संदर्भ पुस्तक प्रकाशन) प्रा. डॉ. सीमा चव्हाण(पेटंट), डॉ.चंद्रभान चौधरी, प्रा. डॉ. अर्जुन भागवत,प्रा. सचिन सोनवणे, प्रा.किरण पवार, प्रा. डॉ. विशाल पवार (पुस्तक प्रकाशन), प्रा.अमोल चंदनशिवे,(पर्यावरण शिक्षण व जल सुरक्षा या विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड) प्रा.डॉ. मोहन सांगळे, प्रा.किशोर पाटील व श्रीमती.रेखा जानराव (आदर्श सेवक पुरस्कार) कु. आस्मा पठाण, (आदर्श विद्यार्थी पुरस्कार) इ.चा विविध कारणे सन्मान करण्यात आला.

जाहिरात
जाहिरात

यानंतर कै. सुशिलाबाई शंकरराव काळे (माई )आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांची घोषणा प्रा. हिंगे यांनी केली. यानुसार प्रथम क्रमांक- शुभम मंगेश सरदेसाई(श्रीमान भागोजी शेठ खीर लॉ कॉलेज रत्नागिरी), द्वितीय क्रमांक- प्राप्ती दीपक बुधवंत(के. बी. रोहमारे जुनिअर कॉलेज,कोपरगाव), तृतीय क्रमांक-कु. कोमल नरेंद्र शेलार (एस. एस. जी. कॉलेज, मालेगाव कॅम्प मालेगाव), उत्तेजनार्थ पारितोषिके- प्रथमेश धायगुडे रायगड, कु. सिद्धी बाफना पाथर्डी,वसुधा पाटील पुणे याप्रमाणे देण्यात आली. तर ‘फिरता-स्मृती करंडक’. कु .कोमल नरेंद्र शेलार व प्रशांत चिंतामण बेले (एस. एस. जी. कॉलेज, मालेगाव कॅम्प मालेगाव) यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. यानंतर कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक विभागामध्ये विविधप्रसंगी यश प्राप्त केलेल्या आणि आपापल्या वर्गात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी महेंद्रकुमार काले, डॉ. श्री. ज्ञानेश्वर वाकचौरे (सदस्य, महाविद्यालय विकास समिती), यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या दिमाखदार वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. सदर कार्यक्रमाचे आभार कु.साक्षी सवई हिने मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा चव्हाण, सौ.डॉ.वैशाली सुपेकर व प्रा.रवींद्र हिंगे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 5 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे