संजीवनी उद्योग समूह

१४ व्या राष्ट्रीय सबज्युनीअर चॉकबॉल स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न

0 5 3 7 6 6

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

शिर्डी येथे १४ वी राष्ट्रीय चॉकबॉल स्पर्धा संपन्न होत असून उद्घाटन समारंभ २१ मार्च रोजी पार पडला.श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, संजीवनी शैक्षणिक, कृषी आणि ग्रामीण विकास विश्वस्त संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे,स्पर्धा निरीक्षक अनिल मोट,प्रतिनिधी राकेश कुमार,मुख्य परीक्षक यदुराज शर्मा,टेक्निकल कमिटी चेअरमन हिमांशु दस्तीदार,स्टेट सेक्रेटरी सुरेश गांधी,मकरंद कोऱ्हाळकर,राजेंद्र कोहकडे यासह असोसिएशनचे पदाधिकारी,खेळाडू,प्रशिक्षक,प्रेक्षक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.राष्ट्रीय स्तरावरील सूत्रबद्ध नियोजनाप्रमाणे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र,आसाम,आंध्र प्रदेश,बिहार,दिल्ली,गोवा,गुजराथ, झारखंड,मध्य प्रदेश,पंजाब,राजस्थान, तेलंगणा,उत्तर प्रदेश,वेस्ट बंगाल आदींसह विविध राज्यातून संघ दखल झाले आहे.आयोजक संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून खेळाडूंची निवास,भोजन,प्रवास व्यवस्था करण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात

उष्णतेचा विचार करता खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय कक्ष व डॉक्टर उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.प्रचलित खेळ प्रकारापेक्षा नावीन्य असणारा हा क्रीडा प्रकार आहे.शिर्डी सारख्या पावन भूमीत देशातील खेळाडू येणे ही अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे उज्वल भविष्य घडावे आणि यातील खेळाडूना भरघोस पडके भविष्यात मिळावी यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे.सौ.रेणुकाताई कोल्हे आणि संजीवनी ग्रुप यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा होणे खेळाडूंच्या दृष्टीने चांगली उपलब्दी असून अतिशय चांगले आयोजन नियोजन केले आहे हे कौतुकास्पद आहे.स्पर्धेसाठी आवश्यक असेल तिथे सहकार्य शिर्डी साईबाबा संस्थान करेल कारण शरीर चांगले राहिले तर विचार आणि मन तंदुरुस्त राहते यासाठी खेळाचे महत्व गरजेचे आहे.संजीवनी ग्रुपने आणि रेणुकाताई कोल्हे यांनी ही या क्रीडा प्रकाराला अधिक ओळख निर्माण करण्यासाठी केलेले हे आयोजन उल्लेखनीय आहे अशा शुभेच्छा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिल्या.चॉकबॉल हा खेळ आपल्या ग्रामीण भागात अधिकाधिक खेळला जावा यासाठी आम्ही हे आयोजन चॉकबॉल असोसिएशन यांच्या समवेत नियोजन करून केले आहे.देशभरातील खेळाडू शिर्डी मध्ये यावे आणि या खेळाला ग्रामीण भागात लोकप्रियता वाढीसाठी आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात
जाहिरात

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य यासाठी लाभले आहे.तसेच असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिक्षक,विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.मैदान पूजन,ध्वज पुजन,मशाल प्रज्वलीत करून प्रातिनिधिक सामना महाराष्ट्र व राजस्थान संघात खेळवला गेला.या समारंभात संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्व सांगणारे सुंदर नृत्य प्रदर्शित केले त्याचे सर्वांनी कौतुक केले.शेवटी आभार सुनीता कोऱ्हाळकर यांनी मानले.राष्ट्रगीताने या समारंभाची सांगता करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र माझा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 7 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे